Rishabh Pant: ५ डावांमद्ये ८६ धावा, पंतने वाढवली समस्या, हा विकेटकीपर जागा घेण्यास तयार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 13, 2022 | 14:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ind vs SA: टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत खराब फॉर्मात आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात तो २७ धावा करून बाद झाला. 

rishabh pant
५ डावांमद्ये ८६ धावा, पंतने वाढवली समस्या 
थोडं पण कामाचं
  • ऋषभ पंतसाठी संजू सॅमसन हा मोठा दावेदार ठरू शकतो.
  • गेल्या ५ डावांमध्ये ऋषभ पंतची खराब कामगिरी
  • द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात तो २७ धावा करून बाद झाला. 

Rishabh Pant Poor Form : टीम इंडिया (Team India)चा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) चा खराब फॉर्म अद्याप सुरू आहे. दक्षिण अफ्रीका (South Africa)विरुद्धच्या कसोटी मालिकेतील (Test Series) तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात त्याला केवळ २७ धावा करता आल्या. पंतच्या बॅटमधून धावा निघून बराच काळ लोटला आहे. पंत गेल्या पाच डावात केवळ अनुक्रमे, ८, ३४, १७, ० आणि २७ धावा करू शकलाय. या दरम्यान त्याला एकूण ८६ धावा करता आल्यात. त्याची ही कामगिरी पाहता त्याला संघातून बाहेर बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, हे निवड समितीवर अवलंबून आहे की ते त्याला संधी देतात की नव्या विकेटकीपरला संघात समाविष्ट करतात. पंतला बाहेरचा रस्ता दाखवला तर त्याची जागा घेण्यासाठी अनेक विकेटकीपर आहेत. rishabh pant is in trouble, he makes only 86 runs in 5 innings

जाणून घ्या कोण आहेत हे दावेदार

संजू सॅमसन: २७ वर्षीय संजू सॅमसनला आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी संधी मिळाली आहे. तो आतापर्यंत केवळ एक वनडे सामना खेळला आहे आणि १० टी-२० सामने खेळला आहे. सॅमसनला अद्याप कसोटी क्रिकेट खेळण्याची प्रतीक्षा आहे. संजू सॅमसनने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०२१मध्ये खेळला होता. संजू सॅमसन युवा आहे आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. दरम्यान,नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजू सॅमसनची कामगिरी तितकी खास नव्हती. संजू आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो पंतसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

इशान किशन - झारखंडचा युवा विकेटकीपर फलंदाज अंडर १९चा कर्णधार राहिला आहे. तो भारतीय संघातील विकेटकीपिंगच्या जागेसाठी प्रमुख दावेदारांपैकी एक आहे.. फलंदाजी आणि विकेटकीपिंगमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. २३ वर्षीय इशान किशन भारतीय संघाकडून २ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने वनडेमध्ये ६० आणि टी-२०मध्ये ११३ धावा केल्या आहेत. 

केएस भरत - भरतने आपल्या अनेक धमाकेदार घरगुती क्रिकेटमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली आहे. तो आंध्र प्रदेशकडून खेळतो. त्याने फेब्रुवारी २०१५मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये तिहेरी शतक ठोकले. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी