IND vs SA : भारताचे ३ क्रिकेटर संघासाठी ठरले सर्वात मोठे खलनायक; जिंकलेला सामना गमावला

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 07, 2022 | 15:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa Test Series | सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे भारताला जवळपास जिंकलेल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला.

Rishabh Pant Jasprit Bumrah and Mohammed Siraj became the biggest villain for the Indian team in the second match against South Africa
भारताचे ३ क्रिकेटर संघासाठी ठरले खलनायक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे.
  • मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला त्यामुळे यजमान आफ्रिकन संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
  • दुसऱ्या सामन्यातील पराभवाला रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज जबाबदार असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.

India vs South Africa 2nd test | जोहान्सबर्ग : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. (India vs South Africa Test Series) भारतीय संघाला (Team India) दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे भारताला जवळपास जिंकलेल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारताने जर हा सामना जिंकला असता तर २९ वर्षांत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर संघाने कसोटी मालिकेवर कब्जा केला असता. भारताने दक्षिण आफ्रिकेला चौथ्या डावात विजयासाठी २४० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले होते. त्या आव्हानाला यजमान आफ्रिकेच्या संघाने कोणताही दबाव न हाताळता केवळ तीन गडी गमावून पूर्ण केले. (Rishabh Pant Jasprit Bumrah and Mohammed Siraj became the biggest villain for the Indian team in the second match against South Africa).   

या तीन कारणांमुळे भारत विजयापासून वंचित 

भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ बळींनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. कारण भारताने मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकला होता. दरम्यान आता तिसरा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ११ जानेवारीला केपटाउन येथे होणार आहे. तिसरा सामना मालिकेतील निर्णायक सामना असेल. लक्षणीय बाब म्हणजे दुसऱ्या जोहान्सबर्गमधील सामन्यात भारतीय संघासाठी तीन खेळाडू खलनायक ठरले आहेत. हे ३ खेळाडू व्हिलेन ठरले नसते भारताने दुसऱ्याच सामन्यात मालिकेवर कब्जा करून इतिहास रचला असता. या ३ खेळाडूंच्या निराशाजनक खेळींमुळे भारताकडून मालिका जिंकण्याची संधी हुकली. 

रिषभ पंत 

भारतीय संघाच्या या पराभवामुळे रिषभ पंत (Rishabh Pant) सर्वात मोठा खलनायक ठरला आहे. रिषभ पंतच्या निराशाजनक खेळीने भारताला सामना गमवावा लागला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीनंतर भारतीय संघ यजमान दक्षिण आफ्रिकेला कमीत कमी ३०० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य देऊ शकेल असे वाटत होते, मात्र चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे बाद झाल्यामुळे नंतर हनुमा विहारीने ४० धावांची नाबाद खेळी खेळली. तर पंतने दुसऱ्या डावातील त्याच्या तिसऱ्या चेंडूवर निष्काळजीपणे फटका मारला आणि तो शून्यावर बाद झाला. तेव्हाच दक्षिण आफ्रिकेने डावावर आपली पकड मजबूत केली आणि भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. अशाप्रकारे भारताच्या पराभवानंतर रिषभ पंतच्या बेजबाबदार फलंदाजीवरही चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या १३ डावांमध्ये केवळ २५० धावा केल्या आहेत.

जसप्रीत बुमराह 

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर पिछाडीवर पाहायला मिळाला. जसप्रीत बुमराहकडे आक्रमक गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. पण  जसप्रीत बुमराहने दुसऱ्या कसोटीत त्याच्या चाहत्यांना पूर्णत: निराश केले. जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर जसप्रीत बुमराहच्या चेंडूंमुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे बुमराह आफ्रिकन फलंदाजांवर दबाव टाकण्यात अयशस्वी ठरला. 

मोहम्मद सिराज 

दरम्यान, दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) देखील अयशस्वी ठरला. त्यामुळे मोहम्मद सिराजऐवजी उमेश यादवला या सामन्यात संधी मिळाली असती, तर निकाल वेगळा लागला असता. अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजकडून भारतीय चाहत्यांना खूप आशा होत्या, मात्र त्याला एकही बळी घेता आली नाही. दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने ६ षटके टाकली, मात्र त्याला एकही बळी मिळाला नाही. पहिल्या डावातही त्याने ९.५ षटके टाकली होती. मात्र पहिल्या डावात सिराज दुखापतीच्या कारणास्तव मैदानातून बाहेर गेला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी