रिषभ पंतला वर्ल्ड कपमध्ये का नाही मिळाली संधी? एमएसके प्रसाद यांनी दिले हे कारण 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 15, 2019 | 17:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

निवड समितीने अंबाती रायडू आणि तरूण खेळाडू रिषभ पंत यांना वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान दिले नाही. टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ६ जून रोजी खेळणार आहे. 

RISHABH PANT
खराब विकेटकिंपिंगमुळे पंतला मिळाले नाही तिकीट टू वर्ल्ड कप 

थोडं पण कामाचं

 • रिषभ पंतला ऑस्ट्रेलिया सिरीज भोवली
 • वन डे सिरीजमध्ये केली होती खराब विकेटकिंपींग
 • अंबाती रायडूही सातत्य दाखवू शकला नाही

मुंबई :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने सोमवारी २०१९ च्या वर्ल्ड कपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने अंबाती रायडू आणि रिषभ पंत यांना धक्का देत वर्ल्ड कप संघातून बाहेर केले आहे. विजय शंकर, के एल राहुल, आणि दिनेश कार्तिक यांना या प्रतिष्ठित स्पर्धेत टीम इंडियात सामील करण्यात आले. 

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शेवटी पंतकडून कुठे चूक झाली आणि त्याला वर्ल्ड कपच्या संघात का स्थान देण्यात आले नाही.  पत्रकार परिषदेत एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, पंत हा निवडीच्या अत्यंत जवळ होता. पण त्याच्या विकेटकिंपिंगच्या कौशल्यामुळे मागे राहिला आहे. हेच कारण आहे की त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. एमएसके प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार पंत याला विकेटकीपर म्हणून स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.

तसेच, अनेक माजी क्रिकेटपटूंनी पंत याला वर्ल्ड कपच्या आपल्या संभाव्या संघात स्थान दिले होते. पंत टेस्ट आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधील काही सामन्यात त्यांने चांगली फलंदाजी केली आहे. दरम्यान, पंत याला ऑस्ट्रेलियाविरूद्द वन डे सिरीजसाठी एमएमस धोनीच्या ऐवजी संघात घेतले होते. पण त्यावेळी त्याच्या किंपिंगमुळे त्याच्यावर टीका झाली होती.  निवड समिती अध्यक्षाने पंत यांच्या याच कमतरतेला सर्वांसमोर आणले आहे. तसेच त्याला तिकीट टू वर्ल्ड कप का मिळाले नाही, याचेही कारण या वक्तव्यात आले आहे.  पंतने त्या सिरीजमध्ये अनेक कॅच सोडले होते तसेच अनेक स्टंपिंगचे सोप्या संधी गमावल्या होत्या. तसेच फलंदाजीतही तो फार काही करू शकला नव्हता. तसेच अंबाती रायडू याला कामगिरीत सातत्य न राखल्यामुळे संघातून बाहेर ठेवण्यात आल्याची शिक्षा मिळाली आहे. 


वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ -

 1. विराट कोहली
 2. रोहित शर्मा
 3. शिखर धवन 
 4. केएल राहुल
 5. विजय शंकर
 6. एमएस धोनी
 7. केदार जाधव
 8. दिनेश कार्तिक
 9. युजवेंद्र चहल
 10. कुलदीप यादव
 11. भुवनेश्‍वर कुमार
 12. जसप्रित बुमराह
 13. हार्दिक पांड्या
 14. रवींद्र जडेजा
 15. मोहम्‍मद शमी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
रिषभ पंतला वर्ल्ड कपमध्ये का नाही मिळाली संधी? एमएसके प्रसाद यांनी दिले हे कारण  Description: निवड समितीने अंबाती रायडू आणि तरूण खेळाडू रिषभ पंत यांना वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान दिले नाही. टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ६ जून रोजी खेळणार आहे. 
Loading...
Loading...
Loading...