Team India: वयाच्या २४व्या वर्षात कोट्यावधीच्या संपत्तीचा मालक आहे हा भारताचा खेळाडू, नेटवर्थ ऐकून व्हाल हैराण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 06, 2022 | 12:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Cricketer rishabh pant:टीम इंडियामध्ये २४ वर्षीय खेळाडू कोट्यावधीच्या संपत्तीचा मालक आहे. हा खेळाडू टीमसाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. 

rishabh pant
२४व्या वयात कोट्यावधीचा मालक आहे हा भारतीय क्रिकेटर 
थोडं पण कामाचं
  • ऋषभ पंतने वयाच्या २४व्या वर्षीच टीम इंडियामध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
  • त्याला नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार बनवण्यात आले होते.
  • तो कमी वयात कोट्यावधीचा संपत्तीचा मालक आहे.

मुंबई: टीम इंडिया(team india) सध्या इंग्लंड दौऱ्यावर(england tour) आहे. येथे एकमेव कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने भले हा सामना गमावला असला तरी विस्फोटक फलंदाज ऋषभ पंतने(rishabha pant) आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकलीत. त्याने आपल्या जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. पंत केवळ आपल्या बॅटिंगमुळेच नव्हे तर त्याच्या लक्झरियस लाईफमुळेही अनेकदा चर्चेत असतो. त्याची नेटवर्थ जाणून घेतल्यावर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. rishabh pant networth is 66.42 crore rupees

अधिक वाचा - शिंदेंच्या बंडात सामील होण्याचं कारण तेरा वर्ष जुनं-जैस्वाल

कोट्यावधीच्या संपत्तीचा मालक आहे पंत

ऋषभ पंतने वयाच्या २४व्या वर्षीच टीम इंडियामध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. त्याला नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार बनवण्यात आले होते. तो कमी वयात कोट्यावधीचा संपत्तीचा मालक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार २०२१मध्ये पंतची एकूण संपत्ती भारतीय रूपयांप्रमाणे ३९ कोटी रूपये होती. आता ऋषभ पंतची एकूण नेटवर्थ साधारण ६६.४२ कोटी रूपये झाली 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

महागड्या गाड्यांची आहे आवड

ऋषभ पंतचे कार कलेक्शन खूपच छान आहे. तसेच त्याच्याकडे कोट्यावधींच्या गाड्यांचे कार कलेक्शन आहे. पंतच्या कार कलेक्शनमध्ये  Audi A8, Merecedez आणि Ford गाडीचा समावेश आहे. यांच्या किंमती अनुक्रमे १.८० कोटी, २ कोटी आणि ९५ लाख रूपये आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

एखाद्या महालापेक्षा कमी नाही घर

ऋषभ पंत उत्तराखंडच्या हरिद्वार येथील एका लक्झरी डिझायनर घराचा मालक आहे. पंतच्या घरातील खोल्यांमध्ये प्रचंड स्पेस आहे. वुडनचे काम करण्यात आले आहे. तसेच बेडरूममध्येही मोनोक्रोम लेआऊट आहे. खोल्यांची डिझाईन खूपच मॉर्डन आणि भिंतीवर पेंटिंग्स आहेत. पंतच्या फॅमिलीमध्ये बहीण साक्षी आणि आई सरोज आहे. 

अधिक वाचा - जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठी बातमी

टीम इंडियामधील प्रवास

ऋषभ पंतने भारतासाठी आतापर्यंत ३१ कसोटी, २४ वनडे आणि ४८ टी-२० सामने खेळले आहेत. या कसोटीत त्याने ४३.३३च्या सरासरीने २१२३ धावा केल्यात.तर वनडेमध्ये ३२.५च्या सरासरीने ७१५ धावा केल्यात. याशिवाय पंतने टी-२०मध्ये २३.१६च्या सरासरीने ७४१ धावा केल्यात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी