पंतच्या शतकाने भारताचा विजय झाला सोपा, भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकली

Rishabh Pant not out 125 in third ODI against England, India won by 5 wkts : यजमान इंग्लंड आणि पाहुणा भारत यांच्यातील तीन वन डे मॅचची सीरिज भारताने २-१ अशी जिंकली. निर्णायक तिसरी वन डे भारताने पाच विकेट राखून जिंकली.

Rishabh Pant not out 125 in third ODI against England, India won by 5 wkts
पंतच्या शतकाने भारताचा विजय झाला सोपा, भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पंतच्या शतकाने भारताचा विजय झाला सोपा, भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकली
  • रिषभ पंत : नाबाद १२५ धावा तर हार्दिक पांड्या ७१ धावा आणि चार विकेट
  • रिषभ पंत तिसऱ्या वन डेत मॅन ऑफ द मॅच, हार्दिक पांड्या मॅन ऑफ द सीरिज

Rishabh Pant not out 125 in third ODI against England, India won by 5 wkts : यजमान इंग्लंड आणि पाहुणा भारत यांच्यातील तीन वन डे मॅचची सीरिज भारताने २-१ अशी जिंकली. निर्णायक तिसरी वन डे भारताने पाच विकेट राखून जिंकली. या मॅचमध्ये भारताचा विकेटकीपर रिषभ पंत याने शानदार शतक झळकावले. त्याने नाबाद १२५ धावा केल्या. पंतने १६ फोर आणि दोन सिक्स मारत शतकी खेळी सजवली. तोच तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच झाला तर हार्दिक पांड्या तीन मॅचच्या वन डे सीरिजचा मॅन ऑफ द सीरिज झाला.

मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे निर्णायक वन डे झाली. या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. यजमान इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून ४५.५ ओव्हरमध्ये सर्वबाद २५९ धावा केल्या. इंग्लंडकडून कॅप्टन आणि विकेटकीपर अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्या जोस बटलरने तीन फोर आणि दोन सिक्सच्या जोरावर ६० धावा केल्या. 

इंग्लंडने दिलेल्या २६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४२.१ ओव्हरमध्ये ५ बाद २६१ धावा केल्या. भारताकडून रिषभ पंतने नाबाद शतकी खेळी केली. हार्दिक पांड्याने दहा फोर मारत ७१ धावा केल्या. याआधी त्याने इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद केले. वन डे सीरिजमध्ये हार्दिकने १०० धावा केल्या आणि ६ विकेट घेतल्या. यामुळेच तो मॅन ऑफ द सीरिज झाला.

भारताने इंग्लंड विरुद्धची टी २० सीरिज आणि वन डे सीरिज या दोन्ही सीरिज २-१ अशाच जिंकल्या. टी २० मध्ये भारताने पहिल्या दोन मॅच जिंकल्या आणि इंग्लंडने शेवटची मॅच जिंकली. याउलट वन डे सीरिजमध्ये भारताने पहिली आणि तिसरी मॅच जिंकली तर इंग्लंडने दुसरी वन डे जिंकली. 

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड : ४५.५ ओव्हरमध्ये सर्वबाद २५९ धावा. जेसन रॉय ४१ धावा, जॉनी बेअरस्टो शून्य धावा, जो रूट शून्य धावा, बेन स्टोक्स २७ धावा, कॅप्टन आणि विकेटकीपर असलेला जोस बटलर ६० धावा, मोईन अली ३४ धावा, लिआम लिव्हिंगस्टोन २७ धावा, डेव्हिड विली १८ धावा, क्रेग ओव्हरटन ३२ धावा, ब्रायडन कारसे नाबाद ३ धावा, आर. टोपले शून्य धावा. अवांतर १७. भारताकडून हार्दिक पांड्या ४ विकेट, युझवेंद्र चहल ३ विकेट, मोहम्मद सिराज २ विकेट, रविंद्र जडोजा १ विकेट.

भारत : ४२.१ ओव्हरमध्ये ५ बाद २६१ धावा. कॅप्टन असलेला रोहित शर्मा १७ धावा, शिखर धवन १ धाव, विराट कोहली १७ धावा, विकेटकीपर असलेला रिषभ पंत नाबाद १२५ धावा, सुर्यकुमार यादव १६ धावा, हार्दिक पांड्या ७१ धावा, रविंद्र जडेजा नाबाद ७ धावा. अवांतर ७. इंग्लंडकडून आर. टोपले ३ विकेट तर ब्रायडन कारसे आणि क्रेग ओव्हरटन प्रत्येकी १ विकेट.

भारताचा इंग्लंड दौरा

  1. नव्या वेळेनुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील राहिलेली पाचवी कसोटी : इंग्लंडचा सात विकेट राखून विजय
  2. पहिली टी २० : भारताचा ५० धावांनी विजय
  3. दुसरी टी २० : भारताचा ४९ धावांनी विजय
  4. तिसरी टी २० : इंग्लंडचा १७ धावांनी विजय
  5. पहिली वन डे : भारताचा दहा विकेट राखून विजय
  6. दुसरी वन डे : इंग्लंडचा १०० धावांनी विजय
  7. तिसरी वन डे : भारताचा पाच विकेट राखून विजय

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी