T20 World Cup: ऋषभ पंतच्या स्थानावर टांगती तलवार, हे खेळाडू बनू शकतात विकेटकीपर

Rishabh pant place in team india । गेल्या काही महिन्यांमध्ये ऋषभ पंतची कामगिरी खराब राहिली आहे. अशात टीम इंडियामध्ये असे २ विकेटकीपर आहेत जे टी-२० वर्ल्डकपमध्ये ऋषभ पंतची जागा घेऊ शकतात.

rishabh pant
T20 World Cup:ऋषभ पंतच्या स्थानावर टांगती तलवार 
थोडं पण कामाचं
  • भारताचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध
  • पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव
  • ऋषभ पंतवर टांगती तलवार

Rishabh pant । मुंबई: भारताला  (india)रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्यात टी-२० वर्ल्डकपमध्ये (t-20 WC)दारूण पराभवास सामोरे जावे लागले. हा सामना एकतर्फीच झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानने १० विकेटनी हरवले. या दारूण पराभवामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताचा पुढील सामना ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आहे. जर या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला तर त्यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याचे संकट आहे. अशात टीम इंडिया कोणताही धोका पत्करणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यात ऋषभ पंतची (rishbh pant) कामगिरी चांगली झाली नाही. त्याने ३० चेंडूत ३९ धावांची स्लो खेळी केली.  (Rishabh pant place is in dangerous situation in team India)

पंतवर टांगती तलवार

गेल्या काही महिन्यांमध्ये ऋषभ पंतची कामगिरी खराब राहिली आहे. अशातच टीम इंडियाकडे असे २ विकेटकीपर आहेत जे त्याची जागा घेऊ शकतात. तसेच त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतात. पहिल्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमधील खराब कामगिरीमुळे पाकिस्ताविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. एक नजर टाकूया जे पंतला पर्याय ठरू शकतात. 

इशान किशन

टीम इंडियाचा युवा क्रिकेटर इशान किशन (Ishan Kishan)ताबडतोब फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच विकेटकीपिंगमध्येही तो प्रसिद्ध आहे. इशान किशन ज्या फॉर्ममध्ये खेळतोय ते पाहता पुढील सामन्यात पंतच्या जागी त्याला संधी मिळण्यास हरकत नाही. याआधी टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या वॉर्म अप सामन्यात इशान किशनने अशी खेळी केली होती की इंग्लंडच्या संघाकडे याचे उत्तर नव्हते. इशानने ४६ चेंडूत ७० धावांची खेळी केली. यात ७ चौकार आणि ३ षटकार होते. 

लोकेश राहुल

भारतीय संघात सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कोणाची बॅट चालत असेल तर ती लोकेश राहुलची. लोकेश राहुलची गेल्या १ वर्षातील कामगिरी पाहता त्याने टी-२० टीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. इतकंच नव्हे तर एक विकेटकीपर म्हणूनही त्याला संधी देण्यात आली होती. त्याने कमालीचे प्रदर्शन केले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी