मुंबई: भारतीय संघाने(indian team) वेस्ट इंडिजला(west indies) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप (clean sweap)दिला. भारताने ही मालिका ३-० अशी निर्भेळ जिंकली. कॅरेबियन बेटावर गेल्या १६ वर्षात भारतीय संघ एकही वनडे मालिका(one day series) हरलेला नाही. हाच रेकॉर्ड त्यांनी कायम ठेवला. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाने गोलंदाजी, फलंदाजी या दोनही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. (rishabh pant, suryakumar yadav, rohit sharma says shivaji maharajancha vijay aso in live chat)
अधिक वाचा - अभ्यास करता करता चिमुकला बोलला गंभीर गोष्ट
दरम्यान, आता भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे. त्यासाठी भारतीय संघ आता सज्ज झाला आहे. २९ जुलैपासून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. त्याआधी भारतीय संघाने थोडीफार मस्ती केली.
ऋषभ पंतने इन्स्टालाईव्ह करत सहकाऱ्यांसह मजामस्ती करण्याचा प्रयत्न केला. या इन्स्टा लाईव्हमध्ये ऋषभ पंतसह रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव तसेच अनेक सहकारी होते. ऋषभ पंतने यावेळी अनेक चाहत्यांनाही आपल्या या लाईव्हमध्ये जोडले होते. बराच वेळ सुरू असलेल्या इन्स्टा लाईव्हमध्ये खेळाडूंनी गप्पा मारल्या तसेच मजेदार गोष्टींही रंगल्या.
"𝘼𝙖𝙞 𝙎𝙝𝙖𝙥𝙥𝙖𝙩𝙝" — Mumbai Indians (@mipaltan) July 27, 2022
👉 When Mumbaikars meet Mumbaikars 🤭
📹: @RishabhPant17#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 @surya_14kumar pic.twitter.com/PJIZNWb7qV
या दरम्यान जेव्हा ऋषभ पंतने साक्षी धोनीला इन्स्टाग्राम लाईव्हवर अॅड केले तेव्हा साक्षीने सगळ्यांना हाय केले. यानंतर लगेचच एमएस धोनी दिसला आणि सर्वांना तो हाय करू लागला. या दरम्यान ऋषभ पंतने सगळ्यांना लाईव्ह केले आणि धोनीला म्हणाला, भय्या थोडा वेळ लाईव्हवर राहा. इतक्यातच धोनी हसला आणि त्याने साक्षीच्या हातातून फोन घेत लाईव्ह बंद केले.
अधिक वाचा - दही खाल्ल्यावर या पाच गोष्टी टाळा
यावेळी मुंबई इंडियन्सचे खेळाडूही लाईव्हमध्ये होते. मुंबई इंडियन्सचे खेळाडू एका फॅनशी चक्क मराठीत बोलत होते. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा हे सगळे मराठीत बोलत होते. दरम्यान, यावेळी चाहत्याने आपल्या नावाची टोपी दाखवली तसेच आपण क्रिकेट खेळत असून क्रिकेटच्या ट्राफीही दाखवल्या. चाहत्याला हा आनंद अनावर झाला होता. यावेळी या चाहत्याने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवली आणि म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा...यावेळेस रोहित, सूर्यकुमार, ऋषभ म्हणाला विजय असो...
मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी कॅप्शन दिले की मुंबईकर जेव्हा मुंबईकरांना भेटतात.