ऋषभ पंत वि उर्वशी रौतेला, सोशल मीडियावर जबरदस्त मीम्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 12, 2022 | 17:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rishabh Pant Vs Urvashi Rautela: ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील वादावर सोशल मीडियावर युजर्स चांगलेच मजा घेत आहेत. दोघांमधील वादाचे अनेक मजेदार मीम्स सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. 

urvashi routella- rishabh pant
ऋषभ पंत वि उर्वशी रौतेला, सोशल मीडियावर जबरदस्त मीम्स 
थोडं पण कामाचं
  • उर्वशी रौतेलाने मुलाखतीत मिस्टर आरपी असा उल्लेख केला होता. 
  • ऋषभ पंतने अभिनेत्रीवर खोटे बोलल्याचा केला आरोप
  • उर्वशीने छोटू भैय्या असे म्हणत केले ट्वीट

मुंबई: क्रिकेटर ऋषभ पंत(cricketer rishabh pant) आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला(urvashi rautela) हे दोघेही यांच्यातील अफेअरमुळे तर भांडणामुळे चर्चेत आले आहेत. खरंतर, उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत मिस्टर आरपी(rp) असा उल्लेख केला होता. ही मुलाखत तिने बॉलिवूड हंगामाला दिली होती. यानंतर पंत भडकला होता आणि त्याने खोटे बोलल्याचा आरोप केला होता. पंतने हॅशटॅग मेरा पीछा छोडो बहन. झूठ की भी लिमीट होती है अशी पोस्ट करत अभिनेत्रीवर निशाणा साधला होता. त्यानंतर उर्वशीनेही पंतला छोटू भैय्या म्हटले होते. rishabh pant vs urvashi rautela social media memes

अधिक वाचा - मी मुलाला खायला द्यावे की मारावे? पाकिस्तानी महिलेचा सवाल

ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील वादाची सोशल मीडियावर युजर्स चांगलीच मजा घेत आहेत. या दोघांच्या भांडणामुळे सोशल मीडियावर वेगळाच माहोल बनला आहे. दोघांच्या वादाबाबत अनेक मजेदार मीम्स शेअर केल्या जात आहेत. यात काही लोक ऋषभ पंतची बाजू घेत आहेत. अनेक लोक उर्वशी रौतेलाच्या बाजूने बोलत आहेत. 

पाहा हा मजेदार मीम्स

https://twitter.com/surbhi_1312/status/1557933333598064640?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1557933333598064640%7Ctwgr%5Eb3734d046d4a645ddd5ec15cccd0bbb1e28ed788%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnowhindi.com%2Ftrending-viral%2Farticle%2Frishabh-pant-and-urvashi-rautela-fight-created-different-atmosphere-on-social-media-see-funny-memes%2F431964

उर्वशी रौतेलाने आपल्या मुलातीत सांगितले होते की, मी वाराणसीमध्ये शूटिंग करून दिल्लीत आले होते. संपूर्ण दिवस शूटिंग केल्यानंतर जेव्हा मी हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा खूप थकले होते. यानंतर मी झोपले. मिस्टर आरपी लॉबीमध्ये माझी वाट बघत होता. त्याने मला १७ वेळा कॉल केले मात्र मला समजलेच नाही. मात्र जेव्हा मी ते पाहिले तेव्हा मला खूप वाईट वाटले. त्यानंतर मी त्याला कॉल केला आणि जेव्हा तुम्ही मुंबईला याल तेव्हा आपण भेटू. त्यानंतर आम्ही भेटलोही मात्र तोपर्यंत ही गोष्ट मीडियामध्ये आली होती. 

अधिक वाचा - "मग शिवसेना माझीय असं म्हणायचं का?" उदयनराजे असं का म्हणाले?

याच्या प्रत्युत्तरात ऋषभ पंतने अभिनेत्रीवर खोटे बोलल्याचा आरोप केला आहे. पंतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली होती. ही त्याने १० मिनिटांत डिलीट केली. त्यात त्याने लिहिले होते की हे खूपच फनी आहे. काही लोक थोड्याशा लोकप्रियतेसाठी आणि चर्चेत येण्यासाठी मुलाखतीत खोटे बोलतात. ही खरंच दु:खाची गोष्ट आहे की काही लोक फेम आणि नावासाठी खूप भुकेले आहेत. देवाची कृपा त्यांच्यावर राहावी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी