Rishabh Pantला १.६ कोटींचा चुना, क्रिकेट सहकाऱ्यानेच केली फसवणूक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 24, 2022 | 11:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rishabh pant: पंतच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये १ कोटी ६३ लाखांची फसवणूक झाली आहे.

rishabh pant
Pantला १.६ कोटींचा चुना, क्रिकेट सहकाऱ्यानेच केली फसवणूक 
थोडं पण कामाचं
  • हरयाणाचा क्रिकेटर मृणांक सिंहविरुद्ध भारताच्या विकेटकीपरने १.६ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
  • ऋषभ पंतला महागड्या लक्झरी घड्याळे स्वस्तात खरेदी करून देण्याच्या चक्करमध्ये त्याला इतक्या कोटींचा चुना लागला आहे.
  • मृणांकने ही फसवणूक केली आहे.

मुंबई: आयपीएलमध्ये(ipl) दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतसोबत(rishabh pant) फसवणूक झाली आहे. हरयाणाचा क्रिकेटर मृणांक सिंहविरुद्ध(mrinank singh) भारताच्या विकेटकीपरने १.६ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ऋषभ पंतला महागड्या लक्झरी घड्याळे स्वस्तात खरेदी करून देण्याच्या चक्करमध्ये त्याला इतक्या कोटींचा चुना लागला आहे.rishabha pant cheated by haryana cricketer mrinank for 1.6 crore 

मृणांकने ही फसवणूक केली आहे. याच महिन्यात त्याला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद करण्यात आले. त्याच्यावर एका प्रकरणात बिझनेसमनची ६ लाखांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. जानेवारी २०२१मध्े मृणांकने मला आणि माझ्या मॅनेजरला सांगितले की त्याने लक्झरी घड्याळ, बॅग्स आणि ज्वेलरी सारख्या महागड्या गोष्टींचा बिझनेस सुरू केलाय. त्याने मला सांगितले की अनेक क्रिकेटर्स त्याचे ग्राहक आहेत. सोबतच मला खोटे आश्वासन दिले की तो मला महागडी ब्राँडेड घड्याळ देईल.

अधिक वाचा- केळी विवाहित पुरुषांची जवानी टिकवेल चिरकाल

आरोपी मृणांकवर विश्वास ठेवत ऋषभ पंतने फेब्रुवारी २०२१मध्ये आपल्याकडील काही लक्झरी घड्याळे, दागिन्यांसह महागड्या वस्तू त्याच्याकडे सोपवल्या होत्या यांची एकूण किंमत ६५ लाख ७७ हजार इतकी आहे तेही अद्याप आरोपीने परत केलेले नाहीत.

जेलमध्ये आरोपी

या महिन्याच्या सुरूवातीला जुहू पोलिसांनी ६लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी मृणांकला अटक केली होती. ऋषभ पंतला या खेळाडूकडून फ्रँक मुलर वॅनगार्ड याचिंग सीरिजचे घड्याळ खरेदी करायचे होते. यासाठी सव्वा ३६ लाख रूपये दिले होते. सोबतच रिचर्ड मिलचे एक घड्याळ घेण्यासाठी साडे६२ लाख रूपये दिले होते.

अधिक वाचा -  अंगठ्यावरून जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये

खराब नेतृत्वामुळे दिल्ली बाहेर

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी ऋषभ पंतला नुकतेच टीम इंडियाचा उप कर्णधार बनवण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. मुंबईविरुद्ध सामना न जिंकल्याने त्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी