Rohit Sharma New Look:रोहित शर्माच्या नव्या लूकवर चाहते फिदा, बायको रितिकाने विचारला हा प्रश्न

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 13, 2022 | 12:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit sharma new look: रोहित शर्माची नुकतीच टीम इंडियाच्या टी-२० आणि वनडे कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुखापतीमुळे रोहित संघाबाहेर आहे. 

rohit sharma
रोहितच्या नव्या लूकवर चाहते फिदा, रितिकाने केला हा सवाल 
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्माने शेअर केला न्यू लूक
  • बायको रितिका सजदेहने विचारला हा प्रश्न
  • रोहितच्या नव्या लूकवर चाहते फिदा

मुंबई: भारताचा वनडे आणि टी-२० कर्णधार रोहित शर्माने(team india oneday and t-20 captain rohit sharma) सोशल मीडियावर(social media) बुधवारी स्वत:चा एक फोटो पोस्ट केला. इन्स्टाग्रामवर(instagram) शेअर केलेल्या या फोटोमध्ये हिटमॅन नव्या लूकमध्ये दिसत आहे. तो क्लीन शेव्हमध्ये दिसत आहे. टीम इंडियाच्या सलामी फलंदाजाच्या नव्या लूकवर चाहते विविध कमेंट करत आहेत. यात खुद्द रोहितची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) चाही समावेश आहे. रितिकाने लिहिले, इतका त्रस्त का झाला आहेस?ritika sajdeh question on rohit sharma new look

गेल्या महिन्यात म्हणजेच २१ डिसेंबरला रितिकाच्या बर्थडेनिमित्त रोहितने इन्स्टाग्रामवर तिला शुभेच्छा देताना लिहिले होते की रितिका त्याच्या आयुष्यातील एकमेव प्रेम आहे. यासोबतच रोहितने आपल्या पत्नीला हे ही सांगितले की ती जशी आहे तशीच ती राहावी. हेच त्याला आवडते. रोहितने म्हटले होते माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तु जशी आहेस तशी राहा हेच तुला अधिक आकर्षक बनवते. 

स्नायू खेचल्याच्या दुखापतीमुळे रोहित सध्या दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि वनडे मालिकेतून बाहेर आहे.सध्या तो बंगळुरू स्थित नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात आहे. रोहतची नुकतीच कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. 

कसोटी मालिकेत रोहितच्या जागी प्रियांक पांचाळला मिळाली संधी

द. आफ्रिका दौऱ्यावर दुखापतग्रस्त रोहितच्या जागी प्रियांक पांचाळला संधी मिळाली. मात्र त्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळवता आले नाही. प्रियांकने नुकतेच इंडिया ए साठी द. आफ्रिका दौऱ्यायवर शानदार कामगिरी केली होती. 

जडेजाचा नवा लूक

अलीकडेच 'पुष्पा- द राइज' हा तेलुगु चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या एका दृश्यात अभिनेता बिडी ओढताना दिसत आहे, ज्याची कॉपी रवींद्र जडेजाने केली आहे. याआधीही त्याने या चित्रपटातील एक डायलॉग कॉपी करून व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे आणि त्यामुळेच तो याविषयी सातत्याने प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी