मुंबई : गेल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात वगळले जाईल, असे वाटत असतानाच, पुण्याच्या या फलंदाजाने केवळ अर्धशतकच ठोकले नाही, तर त्याचा मेगा रिकॉर्ड थोडक्यात हुकला. (Rituraj hits a perfect fifty but Gaikwad misses out on mega record)
अधिक वाचा :
IPL Media Rights: आता या टीव्ही चॅनेलवर दिसणार IPL मॅचेस, बीसीसीआयने तोडले कमाईचे रेकॉर्ड्स
गायकवाडच्या या खेळीने सोशल मीडियाला कौतुकांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. दिलीप वेंगसरकर सारख्या खेळाडूने त्याच्या पाठिवर थाप टाकली. यावरुन ऋतुराज अगदी योग्य मार्गाने जात असल्याचे सिध्द होत आहे. गायकवाडने 30 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि अखेरीस तो 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा काढून बाद झाला, परंतु त्याच्या खेळीचा यूएसपी हा मोठा विक्रम होता जो तो थोडक्यात मुकला.
अधिक वाचा :
ODI Rankings: भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी, पाकिस्तानने भारताला टाकले मागे
या मेगा विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, डावाच्या पाचव्या षटकात ऋतुराज गायकवाडला हे करण्याची संधी मिळाली, जेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज नोर्कियाने टाकलेल्या ओव्हरमध्ये सलग पाच चौकार जोडले. शेवटच्या चेंडूवरही त्याने चौकार मारला असता तर तो मेगा रेकॉर्ड क्लबमध्ये सामील झाला असता, जो क्रिकेटच्या इतिहासात केवळ निवडक फलंदाजांनीच केला आहे.
क्रिकेटच्या इतिहासात (एकदिवसीय आणि कसोटी दोन्हीमध्ये) भारताचा संदीप पाटील, विंडीजचा ख्रिस गेल आणि रामनरेश सरवन आणि श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि तिलकरत्ने दिलशान हे फलंदाज आहेत ज्यांनी हा पराक्रम केला आहे. ऋतुराज गायकवाडने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला असता तर इतिहासात मोठा विक्रम करणारा तो केवळ सहावा फलंदाज ठरला असता, पण तसे होऊ शकले नाही. आणि सोशल मीडियावर गायकवाडांच्या चाहत्यांकडून कौतुक होत आहे.