cricket stories : रामबरन प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये  आरएन क्रिकेटने भोसले अकादमीचा केला पराभव  

cricket u-12 premier league । मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल अंडर १२ प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेची दिमागदार सुरूवात झाली आहे. 

RN Cricket beat Bhosle Academy in the Rambaran Premier League final
आरएन क्रिकेटने भोसले अकादमीचा केला पराभव   
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेची दिमाखात पार पडली फायनल 
  • अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १२ स्पर्धेचे आयोजन करतात.
  • रामबरन प्रिमिअर लीगच्या फायनलमध्ये  आरएन अकादमीने भोसले अकादमीचा केला पराभव  

cricket stories  । मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेच्या फायनलमध्ये  आरएन अकादमीने भोसले अकादमीचा आठ गडी राखून पराभव केला. 

अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १२ स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाही. यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने छोट्या स्पर्धा  सर्व मार्गदर्शक नियम पाळून घेण्याची परवानगी मिळाली.  

फायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना  भोसले क्रिकेट अकादमीला २२ षटकात ९ बाद ११० धावाच करता आल्या.   अक्षय चिंचवडकर सर्वाधिक (२७) धावा केल्या.  आरएन क्रिकेटकडून शौर्य गायकवाड ३, वेदांत चिले २ आणि हर्ष रुमडे आणि हेथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


भोसले क्रिकेट अकादमीच्या ११० धावांचा पाठलाग करताना आरएन क्रिकेटच्या संघाने हे आव्हान अवघ्या १५ षटकात २ गडी गमावून पूर्ण केले.  सलामीवीर ई सोरेस (३१)  आणि अद्वैत पालकर (३०) यांनी चांगली सुरूवात करून दिली.  भोसले क्रिकेट अकादमीकडून अक्षय्य चिंचवडकर आणि मॅथन मिस्त्री यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

तिसऱ्या स्थानासाठी सीएन स्पोर्ट्स संघाने जीपीसीसी संघाचा १६ धावांनी पराभव केला.  सीएन स्पोर्ट्स संघाने  प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ६ बाद १७६ धावा केल्या.  जीपीसीसीचा संघ केवळ १६० धावा करू शकला 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी