फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार

टेनिसपटू रॉजर फेडरर याने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली.

Roger Federer pulls out of French Open to protect knee before Wimbledon
फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार 

थोडं पण कामाचं

  • फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार
  • फिटनेस जपण्यासाठी माघार घेतली
  • फ्रेंच ओपनमधून टेनिसपटू नाओमी ओसाकानेही घेतली माघार

नवी दिल्ली: टेनिसपटू रॉजर फेडरर याने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली. अंतिम १६ खेलाडूंमध्ये समावेश झाल्यानंतर त्याने माघार घेतल्याचे जाहीर केले. फेडररने फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत ३ तास ३५ मिनिटे रंगलेल्या सामन्यात डॉमनिक कॉएफरचा ७-६, ६-७, ७-६, ७-५ असा पराभव केला होता. हा सामना जिंकण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली होती. Roger Federer pulls out of French Open to protect knee before Wimbledon

फेडरर वर्षभरापासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याच्या गुडघ्याचे दोनवेळा ऑपरेशन झाले आहे. दुखापत झाली असूनही फ्रेंच ओपन खेळणाऱ्या फेडररला कॉएफर विरुद्धच्या सामन्यानंतर पुन्हा फिटनेसची समस्या जाणवू लागली. यामुळेच त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली. सोशल मीडियावरुन त्याने माघार घेतल्याचे चाहत्यांना सांगितले. फेडररचा पुढचा सामना इटलीच्या माटोओसोबत होणार होता. हा सामना होणार नसल्यामुळे माटोओला पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल. 

फेडररने माघार घेतल्याने राफेल नदालला एकविसावे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे. फ्रेंच ओपनसाठी फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच एकाच गटात आहेत. पण फेडररच्या माघारीमुळे नदालसमोर जोकोविच हेच मोठे आव्हान असल्याची चर्चा आहे.

नाओमी ओसाकाची माघार

फ्रेंच ओपनमधून टेनिसपटू नाओमी ओसाकानेही माघार घेतली. सामनाधिकाऱ्यांनी १५ हजार डॉलरचा दंड केल्यामुळे नाराज झालेल्या नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली. नाओमीने स्पर्धेदरम्यान मैदानावरच वाद घातला होता.

२८ जूनपासून विम्बलडन

इंग्लंडमध्ये २८ जूनपासून विम्बलडन सुरू होईल. या स्पर्धेत खेळण्याकरिता फिटनेस जपण्यासाठी फेडररने फ्रेंच ओपनमधून माघार घेतल्याची चर्चा टेनिसप्रेमींमध्ये सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी