...म्हणून रवी शास्त्रीला सतावतेय रोहित-ईशांतची चिंता

Rohit and Ishant need to be on the Australia flight भारतात असलेल्या रोहित-ईशांतची चिंता सिडनीत कोच रवी शास्त्री यांना सतावत आहे.

Rohit and Ishant need to be on the Australia flight
...म्हणून रवी शास्त्रीला सतावतेय रोहित-ईशांतची चिंता 

थोडं पण कामाचं

 • ...म्हणून रवी शास्त्रीला सतावतेय रोहित-ईशांतची चिंता
 • प्रॅक्टिस मॅच खेळण्यासाठी रोहित-ईशांतला सोमवारी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हावे लागेल
 • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार टेस्ट मॅचची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाईल

सिडनी: फलंदाज रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा भारतात आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सहभागी होण्यासाठी त्यांना लवकरच विमानात बसावे लागेल. वन डे आणि टी ट्वेंटीसाठी दोघांची निवड झालेली नाही. पण भारतात असलेल्या रोहित-ईशांतची चिंता सिडनीत कोच रवी शास्त्री यांना सतावत आहे. (Rohit and Ishant need to be on the Australia flight)

निवड समितीने रोहित शर्माचा समावेश टेस्टसाठीच्या टीममध्ये केला आहे तर ईशांत विषयीचा निर्णय त्याचा फिटनेस तपासून घेतला जाणार आहे. मात्र टीम इंडियाचे कोच ईशांत ऑस्ट्रेलियात असावा या मताचे आहेत. याच कारणामुळे त्यांना रोहित-ईशांत ऑस्ट्रेलियासाठी विमानात कधी बसणार याची चिंता सतावत आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइन राहण्याचे बंधन आहे. भारताची टीम ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलिया ए टीम विरुद्ध टेस्टसाठी प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे. या मॅचमध्ये सहभागी व्हायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा या दोघांना सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियासाठी विमानात बसावे लागेल. 

प्रॅक्टिस मॅच खेळल्यास दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसचा नेमका अंदाज येईल. यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचसाठी अंतिम ११ खेळाडू निश्चित करताना टीम मॅनेजमेंटला निर्णय घेणे सोपे होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार टेस्ट मॅचची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाईल. मालिका जिंकणे भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने आवश्यक आहे.

सध्या टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया ११६ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड ११५ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत ११४ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. टेस्टमधील रँकिंग सुधारणे आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील टीमची स्थिती आणखी चांगली करणे यासाठी ताकदीचे खेळाडू आवश्यक आहेत. याच कारणामुळे रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा विमानात कधी बसणार याची चिंता कोच रवी शास्त्री यांना सतावत आहे.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०२०-२१)

 वन डे

 1. पहिली वन डे - २७ नोव्हेंबर, सिडनी
 2. दुसरी वन डे - २९ नोव्हेंबर, सिडनी
 3. तिसरी वन डे - १ डिसेंबर, कॅनबेरा

टी ट्वेंटी

 1. पहिली टी ट्वेंटी - ४ डिसेंबर, कॅनबेरा
 2. दुसरी टी ट्वेंटी - ६ डिसेंबर, सिडनी
 3. तिसरी टी ट्वेंटी - ८ डिसेंबर, सिडनी

टेस्ट

 1. पहिली टेस्ट - १७ ते २१ डिसेंबर (डे नाईट, पिंक बॉल मॅच), अॅडलेड
 2. दुसरी टेस्ट - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
 3. तिसरी टेस्ट - ७ ते ११ जानेवारी, सिडनी
 4. चौथी टेस्ट - १५ ते १९ जानेवारी, ब्रिस्बेन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी ट्वेंटी भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, मयांक अगरवाल, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (विकेटकीपर)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टेस्ट भारतीय टीम - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमान विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रित बुमराह, मोहम्मद शामी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

दोन अतिरिक्त गोलंदाज भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जातील - कार्तिक त्यागी, इशान पोरेल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी