जे धोनी-कोहलीला जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं; धोका पत्करला आणि न्युझीलंडला केलं क्लिन स्वीप

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 22, 2021 | 13:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताने नाणेफेक जिंकून नंतर फलंदाजी करून आपले शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. पण काल ​​कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Rohit did what Dhoni-Kohli couldn't do, took a risk and did a clean sweep
धोनी-कोहली करू शकले नाही ते रोहितने करुन दाखवले, धोका पत्करला आणि केलं क्लिन स्वीप   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • टी-२० क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला
  • भारताने क्लिन स्वीप करुन काही प्रमाणात बदला घेतला
  • न्यूझीलंड संघाचाही मोठ्या फरकाने पराभव केला.

नवी दिल्ली : टी-२० क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला होता. काल भारत विरुध्द न्यूझीलंड सोबतच्या टी-२० मालिकेत शानदार खेळ दाखवला आहे. तिन्ही सामने जिंकून भारताने क्लिन स्वीप करुन काही प्रमाणात बदला घेतला आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने असा विक्रम केला आहे जे कर्णधार धोनी आणि विराट कोहली त्यांच्या नेतृत्वाखाली कधीच होऊ शकले नव्हते. (Rohit did what Dhoni-Kohli couldn't do, took a risk and did a clean sweep)

रोहितने जोखीम पत्करली आणि सामना जिंकला

कालच्या सामन्यात भारताने 73 धावांनी विजय मिळवल्यामुळे रोहितने आपल्या कर्णधारपदात एका खास विक्रमाची भर घातली. भारताने पहिले दोन्ही सामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करून जिंकले. पण काल ​​कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ भारताला नंतर गोलंदाजी करावी लागली. जे अत्यंत धोक्याचे होते. कारण या वेळी दव पडण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे नंतर गोलंदाजी करणे कठीण होते. पण काल ​​रोहितने ही जोखीम पत्करली आणि सामना जिंकलाच शिवाय न्यूझीलंड संघाचाही मोठ्या फरकाने पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ

भारताने आपल्या घरच्या मैदानावर आतापर्यंत ५६ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी 20 वेळा संघाने नाणेफेक जिंकली आहे. आणि त्या 20 वेळा, फक्त 3 वेळा प्रथम फलंदाजी निवडली आहे. म्हणजेच काल रोहित शर्माचा हा निर्णय या तिसर्‍यामध्ये सामील झाला. पण कालच्या आधी टीम इंडियाला दोन्ही वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय कर्णधाराला ही कामगिरी करता आलेली नाही. म्हणजेच कर्णधार रोहित शर्मासाठी हा विजय खास आहे.

न्यूझीलंडने कमबॅक केलेले पाहणे रंजक

आता संघाने टी-२० मालिका आपल्या नावावर केली आहे. आता त्याची नजर कसोटी सामन्यांवर आहे. संघाने T20 मध्ये क्लीन स्वीप केल्याप्रमाणे आता संघाला 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतही न्यूझीलंडचा क्लीन स्वीप करायचा आहे. 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये कसोटी सामने सुरू होणार आहेत. इतक्या वाईट रीतीने हरल्यानंतर न्यूझीलंडचा संघ कसा पुनरागमन करतो हे पाहणे रंजक ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी