Rohit Sharma वनडे कर्णधार होताच १० वर्ष जुने ट्वीट व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 10, 2021 | 14:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit sharna old tweet viral: रोहित शर्मा भले आज टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू बनलला आहे आणि त्याला नेतृत्वही देण्यात आले आहे. मात्र एक वेळ अशी होती की त्याला ब्लू जर्सी घालण्यासाठी रोखले होते. 

rohit sharma
Rohit Sharma वनडे कर्णधार होताच १० वर्ष जुने ट्वीट व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार
  • कधीकाळी वर्ल्डकपमध्ये मिळाली नव्हती जागा
  • आता आयसीसी स्पर्धांमध्ये करणार नेतृत्व

मुंबई: रोहित शर्माला(Rohit sharma) बीसीसीआयने(bcci) भारतीय वनडे संघाचा कर्णधार(team india oneday captain) बनवला आहे आणि तो याआधीच टी-२० फॉरमॅटचा(t-20 captain) कर्णधार बनवले आहे. रोहितच्या यशाचा प्रवास इतका सोपा नव्हता त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. एक वेळ अशी होती की त्याला निवडीच्या काबीलही समजले जात नव्हते. मात्र हिटमॅनने स्वत:ला निवडण्याइतपत काबील बनवले. Rohit Sharma 10 year old tweet viral after he got one day captaincy

रोहितचे १० वर्ष जुने ट्वीट व्हायरल

जसे रोहित शर्मा भारतीय वनडे संघाचा कर्णधार बनला तसे त्याचे १० वर्ष जुने ट्वीट व्हायरल होऊ लागले. असं म्हणतात की इंटरनेटवर काहीच लपून राहत नाही आणि हिटमॅनने २०११मध्ये जे लिहिले होते ते आता क्रिकेट चाहत्यांनी शोधून काढले आहे. 

वर्ल्डकप २०११मध्ये नव्हता खेळला रोहित

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी वर्ल्डकप २०११ आपल्या नावे केला होता. या स्पर्धेसाठी टीम इंडियात रोहित शर्माची निवड झाली होते. त्यामुळे हिटमॅनने ट्विटरवर आपली निराशा व्यक्त केली होती. 

ट्विटरवर दिसले होते त्याचे दु:ख

रोहित शर्माने ३१ जानेवारी २०११मध्ये ट्विटरवर लिहिले, खूप खूप निराश आहे की वर्ल्डकप संघाचा भाग होऊ शकलो नाही, मला येथून पुढे जाण्याची गरज आहे. मात्र इमानदारीने सांगू की हा खरंच मोठा धक्का आहे. तुमचे काही विचार!

रोहितचे जबरदस्त कमबॅक

रोहितने यानंतर टीम इंडियामध्ये जबरदस्त कमबॅक केले. तसेच चांगला सलामीवीर म्हणून तो समोर आला. २०१५च्या वर्ल्डकपमध्ये त्याने ८ सामन्यांमध्ये ३३० धावा केल्या. यात १३७ धावांच्या खेळीचा समावेश होता. तर २०१९च्या वर्ल्डकपमध्ये त्याने ५ शतकांसह ६४८ धावा केल्या आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी