Rohit Sharma: क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण करताच रोहित शर्माचे भावूक विधान, ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 23, 2022 | 17:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma:आज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली १५ वर्षे पूर्ण करताच भावूक विधान केले आहे. रोहितची गणती नेहमी विस्फोटक फलंदाजांमध्ये होते. त्याने आपल्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिलेत. 

rohit sharma
क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण करताच रोहितचे भावूक विधान 
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्माने भारतासाठी आयर्लंडविरुद्ध २३ जून २००७मध्ये आपले पदार्पण केले होते.
  • पदार्पणानंतर रोहित शर्माने कधीही मागे वळून पाहिले ाही.
  • रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली १५ वर्षे पूर्ण करताच ट्वीटरवर एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

मुंबई: रोहित शर्मा(rohit sharma) आपल्याव विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये(one day cricket) तीन दुहेरी शतक ठोकले आहेत. रोहितने आपल्या फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण जगभरात नाव मिळवले आहे. एक वेळ अशी होती की रोहित शर्माला टीम इंडियामधून बाहेर काढण्यात आले होते मात्र आज तो भारताच्या तीनही फॉरमॅटचा कर्णधार आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने १५ वर्षे पूर्ण केली. याबाबत त्याने भावूक विधान केले आहे. Rohit Sharma 15 years completed in international cricket

अधिक वाचा - देशातून गायब होतोय मलेरिया

रोहितने केले हे विधान

रोहित शर्माने भारतासाठी आयर्लंडविरुद्ध २३ जून २००७मध्ये आपले पदार्पण केले होते. पदार्पणानंतर रोहित शर्माने कधीही मागे वळून पाहिले ाही. त्याच्या नावाने बॉलर्सही घाबरतात. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली १५ वर्षे पूर्ण करताच ट्वीटरवर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले, सर्वांना हॅलो, भारतासाठी पदार्पण केल्यानंतर आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा एक असा प्रवास आहे जो मी आयुष्यभर साठवून जपून ठेवेन. 

यांना दिले धन्यवाद

रोहित शर्माने पुढे लिहिले. मी त्या सर्वांना धन्यवाद करतो जे माझ्या या प्रवासाचा भाग आहेत. त्यांना स्पेशल थँक्यू ज्यांनी मला प्लेयर बनण्यात मदत केली . सर्व, चाहते, क्रिकेट चाहते आणि टीकाकारांना प्रेम आणि सपोर्ट देण्यासाठी धन्यवाद. 

अधिक वाचा - आमदार कैलास पाटलांवर तानाजी सावंत यांनी केले गंभीर आरोप

रोहितचा दम

रोहित शर्माच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठा स्कोर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची खेळी केली होती. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तीन दुहेरी शतक आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक चार शतके ठोकली आहेत. रोहित शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी