Team india: दुसऱ्या वनडेत डॉक्टर बनला रोहित शर्मा, स्वत:च केले खांद्याचे उपचार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 15, 2022 | 19:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit sharma: हिटमॅन रोहित शर्मा गुरूवारी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. मात्र त्याने स्वत:च आपल्या खांद्यावर उपचार केले. 

rohit sharma
दुसऱ्या वनडेत डॉक्टर बनला रोहित शर्मा, स्वत:च केले उपचार 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत फिल्डिंगदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता रोहित शर्मा
  • मैदानावरच त्याने आपला डिस्लोकेट झालेल्या खांद्यावर केले उपचार
  • मैदानावरून फिजिओला पाठवले माघारी

लंडन: भारत आणि इंग्लंड(india vs england) यांच्यात गुरूवारी खेळवण्यात आलेल्या मालिकेच्या दुसऱ्या वनडे सामन्यात(second one day) टीम इंडियााला(team india) १०० धावांनी पराभव सहन करावा लागला. ओव्हलमध्ये(oval) खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात धमाकेदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माची(rohit sharma) बॅट लॉर्ड्समध्ये मात्र चालली नाही. रोहितने १० चेंडूचा सामना केला आणि तो खातेही न खोलता बाद झाला. या सामन्यात ६ विकेट मिळवणाऱ्या रीस टॉप्लेने त्याला बाद केले. Rohit sharma became doctor in second one day, he treat himself

अधिक वाचा - मुख्यमंत्र्यांचं काय फार्महाऊस, हेलिपाॅड ओकेमध्ये

फिल्डिंग करताना खांद्याला झाली दुखापत

रोहित फलंदाजीला येण्याआधी टीम इंडियाच्या फिल्डिंगदरम्यान एक रोचक घटना पाहायला मिळाली. फिल्डिंग करताना रोहित शर्माच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. अशातच रोहितच्या चेहऱ्यावर त्रास पाहायला मिळत होता जे पाहून चाहतेही हैराण झाले. 

रोहितने स्वत: केला इलाज

मात्र यानंतर अचानक रोहित शर्मा खुद्द डॉक्टर बनला. डोळ्याची पापणी मिटताच रोहितने आपला डिस्लोकेट झालेला खांदा रिपेअर केला. रोहितला होणाऱ्या वेदना पाहता फिजिओ त्याच्या मदतीसाठी धावून येत होते. मात्र रोहितने त्यांना परत पाठवले आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद झाला. 

अधिक वाचा- सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर, शहांचा मुलगा आला पहिला

फलंदाजीत दिसला नाही दुखापतीचा परिणाम

कर्णधार रोहित काही काळासाठी मैदानातून बाहेर होता मात्र त्याच्या बॉडी लँग्वेज आणि खेळावर याचा परिणाम अजिबात दिसला ाही. ४९ ओव्हरच्या फिल्डिंग केल्यानंतर फलंदाजी करण्यास तो मैदानावर उथरला मात्र एकही धाव करू शकला नाही. दरम्यान, दुखापतीचा परिणाम त्याच्या खेळावर नजर येत नव्हता. 

रोहितने बनवला हा लाजिरवाणा रेकॉर्ड

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्या सामन्यात एक मॅच विनिंग खेळी केली होती. त्याने ५८ चेंडूचा सामना करताना ७६ धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र या सामन्यात रोहितने १० बॉलचा सामना केला आणि ० धावांवर बाद झाला. यासोबच रोहित शर्मा लॉर्ड्समध्ये खेळवलेल्या वनडे सामन्यात शून्यावर बाद होणारा दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी