IND vs AUS: पहिल्या वनडेत रोहित शर्मा लगेचच माघारी, पण रचला 'हा' मोठा इतिहास

Rohit Sharma: हिटमॅन रोहित शर्माचा बॉल ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सीरीजच्या पहिल्या वनडेत चालला नाही. पण तरी सुद्धा सचिन आणि विराटचा रेकॉर्ड रोहितनं मोडला आहे.

Rohit Sharma
IND vs AUS: पहिल्या वनडेत रोहित शर्मा लगेचच माघारी, पण रचला 'हा' मोठा इतिहास   |  फोटो सौजन्य: Twitter

Rohit Sharma become fastest player to complete 1000 runs agaisnt Australia: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये हिटमॅन रोहित शर्माचा बॉलनं काही धमाल केली नाही. टॉस हरल्यानंतर टीम इंडिया पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरली. पहिल्यांदा टीम इंडियाची ओपनर जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानात आली. रोहित शर्मानं खेळाची सुरूवात मिचेल स्टार्कच्या पहिल्या बॉलवर कवरच्या दिशेनं चौकार मारत केली. याच ओव्हरमध्ये त्यानं एक आणखी चौकार ठोकला. 15 बॉलमध्ये 10 रन केल्यानंतर रोहित पाचव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मिड ऑफमध्ये आऊट झाला. स्टार्कनं रोहितला आपला शिकार बनवला. 

पण आपल्या स्थानिक मैदानावर 10 रनची खेळी करणाऱ्या रोहितनं घरगुती मैदानावर सर्वात वेगानं ऑस्ट्रेलियाविरूद्ध 1 हजार रन करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. रोहितनं ही कामगिरी ऑस्ट्रेलिया टीमविरूद्ध स्थानिक मैदानावर 18 व्या खेळीदरम्यान मिळवली आहे. याआधी हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावावर दाखल आहे. सचिन आणि विराटनं घरगुती मैदानावर 19 व्या वनडेत खेळताना ऑस्ट्रेलियाच्या टीमविरूद्ध 1 हजार रन पूर्ण केले होते. या यादीत चौथ्या स्थानावर इंग्लंडचा इयोन मोर्गन आहे. मोर्गनला या यादीत जागा बनवण्यासाठी 25 खेळी खेळाव्या लागल्या होत्या. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन मॅचची सीरिजच्या पुढच्या दोन मॅच 17 आणि 19 जानेवारीला राजकोट आणि बंगळुरूमध्ये खेळण्यात येतील. गेल्यावेळी भारत दौऱ्यावर अॅरोन फिंचच्या नेतृत्त्वातल्या ऑस्ट्रेलिया टीमनं पाच मॅचच्या सीरिजमध्ये 0-2 पिछाडीनंतर 3-2 अंतरानं विजय मिळवला होता. अशातच सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजयासाठी रोहित शर्माची कामगिरी खूप महत्त्वाची आहे. 

असा असेल संघ 

भारत: विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कप्तान), एश्टन एगर, एलेक्स केरी, पैट कमिंस, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, एश्टन टर्नर, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी