IND vs NZ:रोहितने कापला या खेळाडूचा पत्ता, करिअर आले संकटात

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 18, 2021 | 13:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

रोहित शर्माने पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या या खेळाडूला बाहेर ठेवले ज्याने अनेकदा आपल्या जोरावर भारताला सामने जिंकून दिलेत. 

rohit sharma
IND vs NZ:रोहितने कापला या खेळाडूचा पत्ता, करिअर आले संकटात 
थोडं पण कामाचं
  • रोहितने कापला या खेळाडूचा पत्ता
  • आपला राग केला व्यक्त
  • रोहित शर्मा या सामन्यात युझवेंद्र चहलच्या जागी अक्षर पटेलला प्लेईंग ११मध्ये संधी दिली.

दुबई: भारत(india) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात(t-20 match) नवा कर्णधार रोहित शर्माने(new captain rohit sharma) घेतलेल्या एका निर्णयावरून सवाल उपस्थित केले जात आहेत. रोहित शर्माने पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या अशा खेळाडूला बाहेर ठेवले ज्याने अनेकदा भारताला सामने जिंकवून दिले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी सगळ्यात जास्त विकेट घेणारा गोलंदाज युझवेंद्र चहलला रोहित शर्माने प्लेईंग ११मध्ये स्थान दिले नाही. 

रोहितने कापला या खेळाडूचा पत्ता

युझवेंद्र चहलला संधी न मिळाल्याने सारेच हैराण आहेत. रोहित शर्मा या सामन्यात युझवेंद्र चहलच्या जागी अक्षर पटेलला प्लेईंग ११मध्ये संधी दिली. अक्षर पटेलबाबत बोलायचे झाल्यास त्याने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात ४ ओव्हर गोलंदाजी केली. मात्र कोणताही विकेट न घेता ३१ धावा दिल्या. युझवेंद्र चहलला संधी दिली असती तर न्यूझीलंडचा संघ १५० धावांपर्यंतही पोहोचला नसता. अक्षर पटेलला केवळ त्याच्या बॅटिंग टॅलेंटच्या आधारावर संधी देण्यात आली मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. 

संघात चहलसोबत चुकीचा न्याय

२०२१ हे वर्ष युझवेंद्र चहलसाठी चांगले नाही. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील खराब कामगिरीमुळे चहलला टी-२० वर्ल्डकप संघात सामील करण्यात आले नाही. त्याच्याबदली राहुल चाहरला संधी देण्यात आली. यानंतर निवड समितीवर अनेक सवाल उफस्थित करण्यात आले. यानंतर चहलला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल चाहरच्या जागी निवडण्यात आले मात्र पहिल्या सामन्यात त्याला बेंचवर बसावे लागले. 

राग व्यक्त केला

नुकत्याच टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना युझवेंद्र चहलने आपले दु:ख सांगितले. युझवेंद्र चहलने सांगितले, मी गेल्या चार वर्षांत टीम इंडियामधून ड्रॉप झालो नाही आणि अचानक इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी मला संघातून बाहेर काढण्यात आले. मला खूप वाईट वाटले. मी दोन तीन दिवस एकदम डाऊन होतो. मात्र माझ्या कुटुंबाने आणि बायकोने मला साथ दिली. माझ्या चाहत्यांनी सातत्याने प्रेरणा देणारे पोस्ट शेअर केले. 

पहिल्यांदाच तोडले मौन

युझवेंद्र चहल म्हणाला, मी माझ्या प्रशिक्षकांकडे गेलो आणि त्यांच्याशी बातचीत केली. माझी पत्नी आणि कुटुंबाने माझा आत्मविश्वास वाढवला. माझ्या चाहत्यांनीही मला मदत केले. मी निर्णय घेतला की मी माझा आत्मविश्वास परत मिळवणार आणि यातून बाहेर पडणार. मी दीर्घकाळ असा नाराज राहू शकत नाही. कारण यामुळे माझ्या आयपीएल फॉर्मवर फरक पडला असता. काही दिवसांपूर्वी चहलने टी-२० चा नवा कर्णधार रोहित शर्माबाबत विधान केले. त्याने रोहित आपला मोठा भाऊ असल्याचे म्हटले होते. एका मुलाखतीत त्याने सांगितले की त्याचे आणि रोहितचे नाते भावाचे आहे. रोहितची पत्नी रितिका त्याला छोटा भाऊ मानते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी