T20 World Cup: रोहित शर्माच्या चाहत्याला मैदानात घुसणे पडले भारी, लाखोंचा फटका

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 07, 2022 | 12:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला भेटण्याच्या हेतूने एक भारतीय चाहता रविवारी मेलबर्नमध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळवल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान सुरक्षा रक्षक कडे तोडून मैदानात घुसला या युवा चाहत्याला मात्र याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. 

rohit sharma fan
रोहित शर्माच्या चाहत्याने मैदानात घुसणे पडले इतके भारी की... 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघ झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 187 धावांचे लक्ष्य देत मैदानात उतरली.
  • 17व्या ओव्हरच्या शेवटचा बॉल फेकण्याआधी एक चाहता सुरक्षारक्षक कडे तोडून भारतीय तिरंगा घेत मैदानात घुसला
  • तो युवा भारताचा कर्णधार रोहित शर्माचा चाहता होता

मेलबर्न: टीम इंडियाचे(team india) जगभरात चाहते आहेत. ऑस्ट्रेलियातील(australia) सध्याच्या टी 20 वर्ल्डकपदरम्यानही(t-20 world cup) चाहत्यांचा हाच उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय संघ(indian team) ज्या मैदानावर खेळत असतात तेथील स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असतात. असेच रविवारी भारत(india) आणि झिम्बाब्वे(zimbabwe) यांच्यात मेलबर्नमध्ये खेळवण्यात आलेल्या सुपर 12च्या शेवटच्या सामन्यात पाहायला मिळाले. हजारो भारतीय चाहत्यांचा सपोर्ट टीम इंडियाला होता. rohit sharma enter in ground during match will be fined

अधिक वाचा - तुम्हीही लोकल सलूनमध्ये केस कापता का?

मैदानात घुसला रोहित शर्माचा फॅन

भारतीय संघ झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 187 धावांचे लक्ष्य देत मैदानात उतरली. सामन्यात भारतीय संघ विजयाजवळ पोहोचला असताना 17व्या ओव्हरच्या शेवटचा बॉल फेकण्याआधी एक चाहता सुरक्षा रक्षक कडे तोडून भारतीय तिरंगा घेत मैदानात घुसला . तो युवा भारताचा कर्णधार रोहित शर्माचा चाहता होता. मैदानात घुसताच तो रोहित शर्माच्या दिशेने धावला. मात्र त्याच दरम्यान सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. 

तिरंगा आणि युवा चाहत्याला उचलण्यासाठी धावला रोहित

तो तरूण चाहता खाली पडताच त्याच्या हातात जो तिरंगा होता तो जमिनीवर पडला. अशातच रोहित त्या तरूणाच्या दिशेने धावला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्या तरूणासोबत तिरंगाही हातात घेतला. अशाच रोहितने सुरक्षा रक्षकांना सांगितले की त्याच्यासोबत कड वर्तणूक ठेवू नका. तो चाहता मैदानाबाहेर जात असतानाही रोहितच्या दिशेने पाहत होता. 

6.5 लाखांचा फटका

त्या तरूणाला मैदानात खेळादरम्यान घुसणे चांगलेच महागात पडले. हा नियम तोडण्याऱ्याला आधीपासून घोषित केल्यानुसार 11095.20 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 6.5 लाख रूपयांचा दंड भरावा लागेल. रोहित शर्माला भेटण्याची चूक त्या तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. 

अधिक वाचा - तुमचा मेंदू म्हातारा होतोय का?

झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

सुपर 12 मधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाने जबरदस्त विजय मिळवला. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 186 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेचे फलंदाज झटपट बाद करून तब्बल 71 धावांनी विजय मिळवला. भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी