Rohit Sharma : फ्री शिप मिळाली नसती तर कदाचित रोहित शर्मा दिसला नसता, प्रशिक्षक दिनेश लाड यांची माहिती

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर व हरमीत सिंग तसेच मुंबई रणजी संघाचे आघाडीचे फलंदाज सिद्धेश लाड यांना घडवणारे त्यांचे प्रशिक्षक दिनेश लाड हे रत्नागिरीतील कै. छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमी येथे शालेय क्रिकेटपटूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आले होते.

rohit sharma
रोहित शर्मा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रोहित, शार्दूल,हरमीत यांना मी नाही तर त्यांच्याकडे गुणवत्ता असल्यामुळे ते घडले.
  • मी फक्त त्यांना मार्गदर्शन केले.
  • फ्री शिप मिळाली नसती तर कदाचित रोहित शर्मा दिसला नसता.

Rohit Sharma : रत्नागिरी : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर व हरमीत सिंग तसेच मुंबई रणजी संघाचे आघाडीचे फलंदाज सिद्धेश लाड यांना घडवणारे त्यांचे प्रशिक्षक दिनेश लाड हे रत्नागिरीतील कै. छोटू देसाई क्रिकेट ॲकॅडमी येथे शालेय क्रिकेटपटूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आले होते. तेव्हा त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी रोहित, शार्दूल,हरमीत यांना मी नाही तर त्यांच्याकडे गुणवत्ता असल्यामुळे ते घडले मी फक्त त्यांना मार्गदर्शन केले असे सांगितले. 


लाड म्हणाले की, रोहित शर्मा हा बॉलिंग करायचा, पण नेट मध्ये बॅटिंगची प्रॅक्टिस करताना मी एक दिवस त्याला पहिले आणि त्याची गुणवत्ता माझ्या लक्षात आली त्यानंतर मी त्याला बॅटिंग वर जास्त वेळ दे असे सांगितले आणि त्यानेही खूप मेहनत घेतली आणि आज रोहित उदयास आला तो आपल्यासमोर आहे. परंतु हे गुणवान व मेहनती प्ल्येयर्स आहेत ते त्यांच्या टॅलेंटवर मोठे झाले त्यामुळे मी त्यांना घडवले असे म्हणणे योग्य नाही असेही ते पुढे बोलताना म्हणाले. रोहितला मी आपल्या पालकांसोबत येण्यास सांगितले होते. तेव्हा तो आपल्या काकांसोबत राहत होता. रोहित आपल्या काकांसोबत आला आणि त्यांना सांगितले की या शाळेत प्रवेश घ्या. परंतु शाळेची फी हे तेव्हा २७५ रुपये इतकी होती. तेव्हा त्याच्य काकाने ही फी परवडणारी नव्हती असे सांगितले. तेव्हा लाड यांनी शाळेच्या संचालकांकडून रोहितसाठी फ्रीशिप मंजूर करून घेतली. जर रोहितला ही फ्रीशिप मिळाली नसती तर आज तो एवढा मोठा क्रिकेटपटू झाला नसता असे लाड म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी