IND vs BAN: मोहम्मद शमीच्या ऐवजी अर्शदीपला का दिली शेवटची ओव्हर? रोहित शर्माचे हे उत्तर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 03, 2022 | 11:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 World Cup:भारतीय संघाने अॅडलेडमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशला 5 धावांनी हरवले. सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशला 20 धावांची गरज होती. 

rohit sharma
शमीच्या ऐवजी अर्शदीपला का दिली लास्ट ओव्हर? रोहितचे उत्तर 
थोडं पण कामाचं
  • सामन्यात अर्शदीप सिंह आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
  • बांगलादेशला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची गरज होती.
  • तेव्हा रोहितने अनुभवी मोहम्मद शमीच्या ऐवजी अर्शदीपला बॉल दिला. 

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022(t-20 world cup 2022) हंगामात भारीय संघने(indian team) सेमीफायनलसाठी आपली मजबूत दावेदारी सादर केली आहे. भारतीय संघाने आपला चौथा सामना जिंकला. हा सामना बुधवारी बांगलादेशविरुद्ध(india vs bangladesh) खेळवण्यात आा होता. अॅडलेडमध्ये खेळवण्यात आलेला सामना रोमहर्षक झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने(team india) डकवर्थ लुईस(D/L) नियमानुसार 5 धावांनी विजय मिळवला. rohit sharma gives last over to arshdeep singh instead of mohammad shami

अधिक वाचा - कळव्यात रहिवाशी इमारतीमधील पझल पार्किंगचा फज्जा

सामन्यात एकावेळेस बांगलादेशचे पारडे जड दिसत होते. मात्र कर्णधार रोहित शर्माच्या रणनीतीने टीम इंडियाला पुन्हा सामन्यात आणले. सामन्यात अर्शदीप सिंह आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. बांगलादेशला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची गरज होती. तेव्हा रोहितने अनुभवी मोहम्मद शमीच्या ऐवजी अर्शदीपला बॉल दिला. 

आपल्या या निर्णयाबद्दल रोहित शर्माने खुलासा केला. त्याने सांगितले की अखेर त्याने शमीच्या ऐवजी अर्शदीपला ओव्हरला का दिली. सोबतच रोहितच्या विधानावरून समजते की टीम मॅनेजमेंटने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियासाठी त्याचा पर्याय तयार केला आहे. हा पर्याय अर्शदीप आहे. 

कोहली आणि राहुलचे कौतुक

रोहित शर्माने म्हटले की सामन्यात कठीण काळात मी शात आणि नर्व्हस होतो. मात्र प्लाननुसार चालणे आमच्यासाठी गरजेचे होते. जेव्हा आमच्या हातात 10 विकेट होत्या तेव्हा सामना कोणत्याही बाजूने झुकला असता मात्र ब्रेकनंतर आम्ही चांगली कामगिरी केली. याशिवाय रोहितने यावेळी विराट कोहली आणि केएल राहुलचे तोंडभरून कौतुकही केले. सोबतच सांगितले की या सामन्यात भारतीय संघाची फिल्डिंग सुधारलेली पाहायला मिळाली. अनेक कठीण कॅच आणि धावाही रोखल्या.

आम्ही अर्शदीपला यासाठी तयार केले आहे 

रोहित शर्माने सांगितले, जेव्हा अर्शदीप त्या सीनमद्ये आला तेव्हा आम्ही त्याला विकेट घेण्यास सांगितले. जसप्रीत बुमराह येथे नाही आहे अशातच कोणालाही आमच्यासाठी हे करावेच लागले असते. जबाबदारी तर घ्यायचीच होती. या युवा खेळाडूने पुढे येऊन हे केले. हे सोपे नव्हते. मात्र आम्ही त्याला यासाठी तयार केले. 

अधिक वाचा - कसा असेल तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस ? वाचा राशीभविष्य

सिक्स ठोकल्यावरही संघाला जिंकवून दिला सामना

अर्शदीपने बांगलादेशला शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा करू दिल्या नाहीत. त्याच्या दुसऱ्याच बॉलवर सिक्सर ठोकला गेला. यानंतर त्याने स्वत:ला शांत ठेवले आणि सामन्यात पुनरागमन केले. त्याने सातत्याने यॉर्कर बॉल टाकत बांगलादेशला बॅकफूटवर ठेवले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी