T20 World Cup: रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? दिलीये अपडेट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 09, 2022 | 11:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा  टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनलमद्ये इंग्लंडविरुद्ध मुकाबला रंगणार आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी बातचीत केली. 

rohit sharma
रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अॅडलेडमध्ये नेट प्रॅक्टिस करताना सोपे ड्रिल करत होता.
  • तेव्हा एक शॉर्ट पिच बॉल वेगाने उसळून त्याच्या उजव्या हाताला लागला
  • रोहित शर्माने बुधवारी प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या दुखापतीबाबत सांगितले.

मुंबई: भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या(indian captain rohit sharma) टीम इंडियाने(team india) टी20 वर्ल्ड कप 2022च्या(t-20 world cup 2022) सेमीफायनलमध्ये(semifinal) जागा मिळवली आहे. आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना अॅडलेडच्या ओव्हल() मैदानावर खेळवला जाईल. याआधी एक दिवस आधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत(pressconference) आपल्या दुखापतीबाबत अपडेट(injury update) दिले. अॅडलेडमध्ये सरावादरम्यान त्याला दुखापत झाली होती. rohit sharma gives update about his injury during practice session

अधिक वाचा - दिल्लीसह 7 राज्यांमध्ये भूकंप, नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

टीम इंडियाचे वाढले होते टेन्शन

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अॅडलेडमध्ये नेट प्रॅक्टिस करताना सोपे ड्रिल करत होता. तो थ्रोडाऊन स्पेशालिस्ट एस रघूचा सामना करत होता तेव्हा एक शॉर्ट पिच बॉल वेगाने उसळून त्याच्या उजव्या हाताला लागला. तो सराव सोडून निघून गेला आणि काही वेळ आराम केला. काही वेळानंतर तो पुन्हा मैदानावर आला आणि त्याने सराव सुरू केला. दरम्यान, त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले होते. 

रोहितने दिले अपडेट

रोहित शर्माने बुधवारी प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या दुखापतीबाबत सांगितले. त्याला जेव्हा त्याच्या दुखापतीबाबत विचारण्यात आले तेव्हा रोहित म्हणाला, मला काल सरावादरम्यान बॉल लागला होता मात्र सध्या सर्वकाही ठीक आहे. दुखापत झाली होती मात्र आता ठीक वाटत आहे. यावरून रोहित सेमीफायनलमध्ये खेळणार हे नक्की झाले आहे आणि कोणत्याही प्रकारच्या चिंतेची बाब नाही. 

अॅडलेड मैदानाबाबतही बोलला रोहित

रोहितने अॅडलेड मैदानाबाबतही विधान केले. तो म्हणाला, विविध मैदानांवर खेळणे या स्पर्धेत तुमच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. दुबईत प्रत्येक मैदानात साधारण एकसारखेच होते. येथे वेगवेगळ्या सामन्यांत वेगवेगळे घडत आहे.. अॅडलेड एक असे मैदान आहे जिथे तुम्हाला विविध पर्याय शोधावे लागतात. येथील बाऊंड्री छोटी आहे तर मेलबर्नचे मैदान पूर्ण वेगळे होते. 

न घाबरता खेळण्याची गोष्ट आठवली

रोहित पुढे म्हणाला, मला लक्षात आहे की मी निडर होत खेळण्याची बाब केली होती. आमच्यासाठी येथील परिस्थिती पाहून मैदानावर उतरणे आणि फलंदाजी करणे केवळ इतकेच नाही आहे तर येथील परिस्थितीनुसार अनुकूल असण्याबाबत आहे. सोबतच संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 

अधिक वाचा - प्रेमात आला संशय...पत्नीने दिली 65 तोळे सोन्याची सुपारी

अव्वल स्थानावर टीम इंडिया

भारतीय संघाने सुपर 12 राऊंडमधील ग्रुप 2मध्ये अव्वल स्थानी राहत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. टीम इंडियासमोर आता अॅडलेडमध्ये 10 नोव्हेंबरला इंग्लंडचे आव्हान असणार आहे. भारताने सुपर 12 राऊंडमध्ये केवळ एक सामना हरला आणि 4 सामने जिंकले. त्यांना द. आफ्रिकेकडून पराभवास सामोरे जावे लागले. तर भारताने आधी पाकिस्तान, नेदरलँड्, बांगलादेश आणि झिम्बाब्वेला हरवले. तर इंग्लंडने ग्रुप 1मधून सेमीफायनलसाठी क्वालिफाय केले. त्यांनी 5 पैकी 3 सामने जिंकले. यात एकामध्ये पराभव झाला तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी