IND vs AUS: दिनेश कार्तिकच्या चुकीवर रागावला रोहित, भरमैदानात ओरडत पकडला दिनेशचा गळा

भारतीय संघाला (Indian team) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 4 विकेट्सने दारूण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी (bowlers) अतिशय खराब खेळ दाखवला. भारतीय गोलंदाजांच्या खराब खेळामुळे जोरदार फटकेबाजी करणाऱ्या भारतीय फलंदाजांची (batsmen) मेहनत व्यर्थ गेली.

rohit sharma got angry at dinesh karthik mistake in the live match
भरमैदानात ओरडत रोहितनं पकडला दिनेशचा गळा  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी.
  • कार्तिकने मॅचमध्ये तीन मोठ्या चुका केल्या.
  • भारताकडून फक्त अक्षर पटेलने सर्वोत्तम गोलंदाजी केली.

मोहाली: भारतीय संघाला (Indian team) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 4 विकेट्सने दारूण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी (bowlers) अतिशय खराब खेळ दाखवला. भारतीय गोलंदाजांच्या खराब खेळामुळे जोरदार फटकेबाजी करणाऱ्या भारतीय फलंदाजांची (batsmen) मेहनत व्यर्थ गेली. गोलंदाजाचा रागा रोहितने यष्टीरक्षक दिनेश कार्तिकवर काढला. डीआरएस घेण्यास दिनेश कार्तिकने वेळ लावल्याने आणि विकेटची अपील न केल्याने कर्णधार रोहित शर्मा दिनेशवर संतापला होता.(rohit sharma got angry at dinesh karthik mistake in the live match)

भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन फलंदाजांची विकेट मिळत नसल्यानं कर्णधार रोहित शर्मा वैतागला होता. उमेश यादव यांच्या गोलंदाजीच्या वेळी दिनेश कार्तिकने विकेटची अपील केली नव्हती. आणि डीआरएस घेण्यास त्याने विलंब लावला होता. याचाच राग रोहितला आला. 

Read Also : SpiceJet Update: 80 वैमानिकांना 3 महिन्यांची बिन-पगारी सुट्टी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्माने ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली, पण कार्तिकने मॅचमध्ये तीन मोठ्या चुका केल्या. भारताकडून फक्त अक्षर पटेलने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने आरोन फिंचला लवकर बाद केले. यानंतर स्टीव्ह स्मिथ यजवेंद्र चहलच्या चेंडूवर यष्टीमागे अगदी मध्यभागी सापडला, पण कार्तिकने त्याचा एलबीडब्ल्यू केला नाही.

का पकडला गळा

युझवेंद्र चहलच्या षटकानंतर उमेश यादवने त्याच्या दुसऱ्याच षटकात धमाका करत स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण जेव्हा हे दोन्ही फलंदाज बाद झाले तेव्हा कर्णधार रोहित शर्माने डीआरएस घेतला. दोन्ही वेळेस एज झाल्यानंतरही (चेंडू बॅटच्या  भाग हलकासा लागला) यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने आऊटचे अपील केले नाही. परंतु कर्णधार रोहितने डीआरएस घेतल्यानंतर भाराताला विकेट मिळाली. त्यावेळेस गोलंदाजचे अभिनंदन करण्यासाठी खेळाडू एकत्र जमल्यानंतर रोहितनं दिनेशवर नाराजी व्यक्ती केली. त्याची चुकी सांगत असताना रोहित शर्माने दिनेश कार्तिकाचा गळा पकडला. दरम्यान त्यावेळेस संघातील खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण होते. 

Read Also : आज आहे शास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्मदिन

भारतीय संघ हरला

टीम इंडियाकडून अक्षर पटेलशिवाय कोणताही गोलंदाज अप्रतिम खेळ दाखवू शकला नाही. भुवनेश्वर कुमारने चार षटकांत ५२ धावा दिल्या. त्याचवेळी हर्षल पटेलने आपल्या चार षटकांत ४९ धावा दिल्या, या दोन्ही अनुभवी गोलंदाजांना सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही. युझवेंद्र चहलही आपल्या लयपासून दूर गेलेला दिसला. त्याने 3.2 मध्ये 42 धावा दिल्या. गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. भुवनेश्वरची मात्र सर्वात्तम खराब गोलंदाजी झाली. आशिया कप टी20 च्या सामन्या दरम्यानही भुवनेश्वरने दोन सामन्यात अखेरच्या षटकांत खूप धावा दिल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी