Video: कॅच पकडल्यानंतर रोहितचा डान्स, तुम्हाला येईल या WWE सुपरस्टारची आठवण

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 05, 2019 | 19:41 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात भारताच्या क्रिकेटर्सनी चांगली फिल्डिंग केली. या दरम्यान असे काही पाहायला मिळाले की क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांना WWE सुपरस्टारची आठवण आली.

rohit sharma and wwe star
रोहित शर्मा आणि wwe स्टार  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९मध्ये आपला पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरूवात चांगली झाली आहे. गोलंदाजीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने आफ्रिकेच्या संघाला २२७ धावांमध्ये रोखले. आता फलंदाजांवर टीम इंडियाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आहे. या सामन्यात भारताच्या क्रिकेटर्सनी शानदार फिल्डिंग केली. या दरम्यान, मैदानावर प्रेक्षकांना असे काहीतरी पाहायला मिळाले जे पाहून चाहत्यांना क्रिकेटच्या मैदानावर WWE सुपरस्टारची आठवण आली. 

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले यश लवकर मिळाले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हाशिम आमलाला स्लिपमध्ये रोहितच्या शर्माच्या हातातून झेलबाद केले. अमलाचा कॅच घेतल्यानंतर रोहित आनंदाने नाचत होता. यावेळी त्याने WWE चे माजी सुपरस्टार रिक फ्लेयरची आठवण करून दिली. त्याने सिग्नेचर स्टेपमध्ये डान्स करत आपला आनंद व्यक्त केला. रिक फ्लेयरही अशाच प्रकारे आपला आनंद व्यक्त करत असतं. आयसीसीने हिटमॅनचा हा डान्सिंग व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच पोस्टही केला आहे. 

रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, रोहितजवळ आफ्रिकेच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवण्याची संधी आहे. भारतीय संघाला या सामन्यात जिंकण्यासाठी केवळ २२८ धावांची आवश्यकता आहे. यातच रोहितकडे चांगली फलंदाजी करण्याची संधी आहे. 

भारताचा हा वर्ल्डकपमधील पहिलाच सामना आहे. याआधी आफ्रिकेने या स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. पण त्यांचा दोनही सामन्यांत पराभव झाला. पहिल्या सामन्यात त्यांना यजमान इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागले तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने त्यांचा पराभव केला. 

वर्ल्ड कप- 2019 मध्ये टीम इंडियाचे शेड्यूल्ड

 1. भारत विरुद्ध द.आफ्रिका, साउथम्पटन - 5 जून
 2. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओवल - 9 जून
 3. भारत विरुद्ध न्यूझीलंड, ट्रेंट ब्रिज - 13 जून
 4. भारत विरुद्ध पाकिस्तान, ओल्ड ट्रॅफर्ड - 16 जून
 5. भारत विरुद्ध अफगाणिस्तान, साउथम्पटन - 22 जून
 6. भारत विरुद्ध वेस्टइंडीज, ओल्ड ट्रॅफर्ड - 27 जून
 7. भारत विरुद्ध इंग्लंड, अॅजबेस्टन - 30 जून
 8. भारत विरुद्ध बांग्लादेश, अॅजबेस्टन - 2 जुलै
 9.  भारत विरुद्ध श्रीलंका, लीड्स - 6 जुलै
 10. 9 जुलै: सेमीफायनल 1, ओल्ड ट्रॅफर्ड
 11. 11 जुलै: सेमी-फायनल 2, अॅजबेस्टन
 12. 14 जुलै: फायनल, लॉर्ड्स

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी