Rohit Sharma Tweet: पराभवानंतर रोहित शर्माचं पहिलं ट्विट, अशा व्यक्त केल्या भावना

Rohit Sharma tweets: वर्ल्ड कप २०१९ मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला. पराभवानंतर रोहित शर्मानं पहिल्यांदा ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit sharma
Rohit Sharma Tweet: पराभवानंतर रोहित शर्माचं पहिलं ट्विट, अशा व्यक्त केल्या भावना  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • पराभवानंतर रोहित शर्माचं पहिलं ट्विट
  • ट्विटमधून व्यक्त केल्या आपल्या भावना
  • रोहितनं चाहत्यांचे मानले आभार

मुंबईः  वर्ल्ड कप २०१९ मध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला. टीम इंडियाचा पराभव सगळ्याच्याच जिव्हारी लागला आहे. त्यात टीम इंडियाचा स्टार ओपनर रोहित शर्मानं आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये खूप चांगली कामगिरी केली. मात्र न्यूझीलंड विरूद्ध खेळताना रोहित शर्माची बॅट काम करू शकली नाही. रोहित शर्मानं टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा आपल्या फॅन्सना संदेश दिला आहे. रोहितनं ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटमधून रोहितनं आपल्या भावनांसोबत टीमच्या चुका आणि फॅन्सचे आभार देखील मानले आहेत. 

रोहित शर्मानं ट्विटमध्ये लिहिलं की, ' महत्त्वाच्या वेळी एक टीम म्हणून आम्हांला जेव्हा चांगल प्रदर्शन करण्याची वेळ होती तेव्हाच आम्हाला अपयश आलं.  ३० मिनिटांच्या खराब क्रिकेटनं आमच्याकडून कप जिंकण्याची आशा हिसकावून घेतली. माझ्या मनाला माहिती की मला किती वेदना होत आहेत. मला माहितेय त्या तुम्हालाही होत असतील.  संपूर्ण टूर्नामेंटमध्ये तुम्ही दिलेला पाठिंवा अविश्वसनीय होता. घरापासून दूरवर मिळालेला पाठिंबा अविश्वसनीय होता. आम्ही यूके मध्ये जिथे जिथे खेळलो त्यातील बहुतेक भागात निळ्या रंगाचे चित्रण केल्याबद्दल आपले आभार. 

Rohit Sharma Tweet

पराभवानंतर विराट कोहलीची प्रतिक्रीया 

पराभवानंतर प्रेजेंटेशन सेरेमनी आणि पत्रकार परिषदेत कॅप्टन विराट कोहलीनं म्हटलं की, आमच्या सगळं काही होतं ज्याची मैदानावर गरज होती. आमचा कालचा दिवस चांगला होता. आम्हांला वाटलं की सर्व ठिक आहे. मात्र न्यूझीलंडच्या बॉलर्संनी चांगली कामगिरी केली. त्यांना मैदानावर चांगली स्विंग मिळाली. त्यांनी चांगल्या खेळाचं उदाहरण सादर केलं. 

विराटनं टीमचं कौतुक केलं. तसंच टीम इंडियानं वर्ल्ड कप २०१९ मध्ये चांगली कामगिरी केल्याचं विराट म्हणाला. टीम इंडियाचा पराभव हा फक्त ४५ मिनिटांच्या खेळीमुळं झाला असं देखील विराट म्हणाला.  पुढे विराट कोहलीनं म्हटलं की, आम्ही वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली आणि सतत चांगला खेळ खेळलो. आम्ही पॉईंट्स टेबलमध्येही टॉपवर होतो. बस केवळ एक खराब दिवस तुमची सगळी मेहनत खराब करू शकतो.

टीम इंडियानं ५ धावांवर आपले ३ विकेट्स गमावले. टीम इंडियानं आपला तिसरा विकेट केएल राहुलच्या रूपानं चौथ्या ओव्हरमध्ये गमावला. यावेळी मॅट हेनरीनं रोहित शर्मा (१), विराट कोहली आणि लोकेश राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर १० व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिक (६) ही आऊट झाला. हे सर्व काही सुरूवातीच्या ४५ मिनिटांमध्ये झालं आणि विराटनं याच गोष्टीचा उल्लेख केला. विराट कोहलीनं म्हटलं की, ती ४५ मिनिटं खराब क्रिकेट तुम्हांला टूर्नामेंटमधून बाहेर करू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Rohit Sharma Tweet: पराभवानंतर रोहित शर्माचं पहिलं ट्विट, अशा व्यक्त केल्या भावना Description: Rohit Sharma tweets: वर्ल्ड कप २०१९ मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला. पराभवानंतर रोहित शर्मानं पहिल्यांदा ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola