ohit Sharma will pay with West indies : बंगळुरू : भारताचा वन डे आणि टी २० संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)डाव्या हाताच्या (हॅमस्ट्रिंग) दुखापतीतून बरा होत आहे. यासाठी तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या सहा सामन्यांच्या लिमिटेड ओव्हर सिरीजमध्ये मैदानावर त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी रोहितला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, पण संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी प्रॅक्टीस सेशनदरम्यान जखम झाली होती. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये हॅमस्ट्रिंगचा (मसल्स ताणल्या जाणे) त्रास होऊ लागल्याने त्याला बाहेर पडावे लागले. पूर्णपणे बरा न झाल्याने तो दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या वन डे मालिकेतूनही बाहेर पडला आहे.
Also Read : Rohit sharma: रोहितला कसोटी कर्णधार बनवले जाऊ नये, या दिग्गज खेळाडूचे मत
बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “नॅशनल क्रिकेट अॅकडमीमध्ये रोहितच्या रिहॅबचे प्रयत्न सुरू आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी तो तयार असेल, अशी अपेक्षा आहे. अहमदाबादमध्ये ६ फेब्रुवारीला पहिला वन डे सामना खेळला जाणार आहे. त्याला अजून तीन आठवडे बाकी आहेत.''
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तीन वनडे आणि तितकेच टी-२० सामने खेळले जाणार आहेत. ६ ते १२ फेब्रुवारी दरम्यान वन डे सामने, तर १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान टी-२० इंटरनॅशनल सामने खेळले जाणार आहेत. बीसीसीआयच्या सध्याच्या धोरणानुसार, प्रत्येक खेळाडूला संघात परत येण्यापूर्वी एनसीए (नॅशनल क्रिकेट अॅकडमी) येथे अनिवार्य फिटनेस चाचणी द्यावी लागते आणि 'फिट टू प्ले' प्रमाणपत्र मिळवावे लागते.
Also Read : IND vs SA, ODI Series: द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी अशी असू शकते टीम इंडिया
रोहित हा सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे इंटरनॅशनल क्रिकेटचा सर्वात जास्त अनुभवही आहे. पण कसोटी कर्णधारपद देण्यापूर्वी बीसीसीआयने रोहितपुढे एक अट ठेवल्याचे आता समोर आले आहे. रोहितकडे आता भारताच्या ट्वेन्टी-२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता कसोटी कर्णधार देताना बीसीसीआयने रोहितपुढे फिटनेसची अट ठेवली असल्याचे वृत्त 'इनसाइड स्पोर्ट्स'ने दिले आहे. कारण सध्याच्या घडीला रोहित शर्मा हा संघाबाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी सराव करताना रोहितला दुखापत झाली होती आणि त्यामुळेच तो या दौऱ्यावर जाऊ शकला नाही.
Also Read : Big Bash League: Glenn Maxwellने पकडला असा जबरदस्त कॅच, स्वत:ही झाला हैराण
रोहित फिट नसल्यामुळेच तो दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेतही खेळणार नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला फिटनेस ही रोहितपुढची सर्वात मोठी समस्या आहे. कारण तिन्ही संघांचे कर्णधारपद सांभाळायचे असेल तर रोहितचा वर्कलोड नक्कीच वाढणार आहे. कारण कोणत्याही संघाचे कर्णधारपद सांभाळणे ही सोपी गोष्ट नसते. त्यामुळे फिटनेस सांभाळून भारताच्या तिन्ही संघांचे कर्णधारपद रोहितला भूषवता येणार आहे का, हे बीसीसीआय त्याच्याकडून जाणून घेणार आहे.