Rohit Sharma: रोहितच्या नावावर हा लाजिरवाणा रेकॉर्ड, लॉर्ड्समध्ये असे करणारा दुसरा भारतीय कर्णधार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 15, 2022 | 14:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma: पहिल्या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करणारा रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत खातेही खोलू शकला नाही. या सामन्यात त्याच्या नावावर एका लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. 

rohit sharma
Rohit Sharma: रोहितच्या नावावर हा लाजिरवाणा रेकॉर्ड 
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्माच्या नावावर लॉर्ड्सच्या मैदानावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.
  • हा लाजिरवाणा रेकॉर्ड रोहित शर्माआधी भारताच्या केवळ एका कर्णधाराच्या नावावर आहे. 
  • रोहित शर्माच्या आधी हा लाजिरवाणा रेकॉर्ड टीम इंडियाचे सध्याचे हेड कोच राहुल द्रविडच्या नावावर होता.

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने(team india captain rohit sharma) वनडे मालिकेच्या(one day series) आधी धमाकेदार फलंदाजी केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात तो खातेही खोलू शकला नाही. त्याच्या खराब खेळीनंतर रोहित शर्माच्या नावावर लॉर्ड्सच्या मैदानावर(lords ground) एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. हा लाजिरवाणा रेकॉर्ड रोहित शर्माआधी भारताच्या केवळ एका कर्णधाराच्या नावावर आहे. Rohit sharma make new bad record on lords cricket ground

अधिक वाचा - मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्याआधी ही बातमी नक्की वाचा

रोहितने बनवला हा लाजिरवाणा रेकॉर्ड

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्या सामन्यात एक मॅच विनिंग खेळी केली होती. त्याने ५८ चेंडूचा सामना करताना ७६ धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र या सामन्यात रोहितने १० बॉलचा सामना केला आणि ० धावांवर बाद झाला. यासोबच रोहित शर्मा लॉर्ड्समध्ये खेळवलेल्या वनडे सामन्यात शून्यावर बाद होणारा दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. 

याआधी कर्णधाराने केले होते असे काम

रोहित शर्माच्या आधी हा लाजिरवाणा रेकॉर्ड टीम इंडियाचे सध्याचे हेड कोच राहुल द्रविडच्या नावावर होता. राहुल द्रविड २००७ दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार होता. या मालिकेतदरम्यान लॉर्ड्सवर खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात राहुल द्रविड खाते खोलू शकला नव्हता. इतकंच नव्हे तर या सामन्यात भारतीय फलंदाज फेल ठरले होते. तेव्हा संघ ४७.३ ओव्हरमध्ये १८७ धावांवर ऑलआऊट झाला होता. 

अधिक वाचा - 'राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत काय?'

पंतने बनवला हा लाजिरवाणा रेकॉर्ड

टीम इंडियाचे विकेटकीपर फलंगाज ऋषभ पंत या सामन्यात फ्लॉप राहिला. त्याचप्रमाणे कर्णधार रोहितही सामन्यात खाते खोलू शकला नाही. या सामन्यात ऋषभ पंतने शून्यावर आपली विकेट गमावल. या सामन्यानंतर ऋषभ पंत सेना देशांमध्ये एका कॅलेंडर इयरमध्ये तीन वेळा शून्यावर बाद होणारा पहिला विकेटकीपर बनला आहे. सेना देशामध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे नाव येते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी