मुंबई: भारताचा क्रिकेट कर्णधार रोहित शर्माला(team india captain rohit sharma) वेस्ट इंडिजविरुद्धच्या(india vs west indies) तिसऱ्या टी-२० सामन्यात पाठीला दुखापत(injury) झाली होती. याबाबत बोलताना सांगितले की मालिकेच्या चौथ्या सामन्यासाठी काही दिवस बाकी आहेत आणि आशा आहे की तो ठीक होईल. भारताने मंगवारी यजमान संघाला ७ विकेटनी हरवत पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. rohit sharma may be played in india vs west indies match
अधिक वाचा - फुकटात देण्याचे राजकारण अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे
मात्र रोहित शर्माला पाठीच्या दुखापतीनंतर दुखापतग्रस्त होत रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. रोहित ११ धावा करून मैदानावरून बाहेर गेला. रोहितने अल्जारी जोसेफला दुसऱ्या ओव्हरमध्ये एक सिक्स आणि एक फोर लगावला होता. मात्र दुखणे असह्य झाल्याने अखेरीस रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. बीसीसीआयने दुजोरा दिला की रोहित पाठीच्या समस्येने ग्रस्त आहे.
दुखापत गंभीर असण्याची शंका दूर करत रोहितने सांगितले की माझे शरीर ठीक आहे. आपल्याकडे काही दिवस आहेत त्यामुळे आशा आहे की मी ठीक होईन. रोहित सोमवारी दुसऱ्या टी-२०मध्ये मिळालेल्या पराभवानंतर भारताला आघाडी मिळवून देणाऱ्या गोलंदाजाकडून खुश होता.
अधिक वाचा - 4×400m मिश्र रिले संघाने जिंकले रौप्य पदक
त्याने सांगितले, आमच्यासाठी मधल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे महत्त्वाचे होते. त्यांना एक चांगली भागीदारी मिळणार होती. आम्ही परिस्थिती आणि आपल्या विविधतेचा वास्तवात चांगला वापर केला आणि त्यानंतर आम्ही आव्हानाचा पाठलाग केला. रोहितने हेही सांगितले की सूर्यकुमार यादवला मॅच जिंकवणाऱ्या खेळी खेळताना पाहून आनंद झाला. रोहितसोबत डाव सुरू करणाऱ्या सूर्याने ४४ बॉलमध्ये ७६ धावांची खेळी केली.
हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ ओव्हर गोलंदाजी करत त्याने ४.७५च्या इकॉनॉमीने केवळ १९ धावा खर्च केल्या आणि १ विकेट मिळवला. ही विकेट मिळवाना हार्दिक पांड्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ५० विकेट पूर्ण केल्या. तसेच जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केला. हार्दिक पांड्या भारताचा असा पहिला खेलाडू बनला आहे ज्याच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ५००पेक्षा जास्त धावा आहेत आणि ५० विकेट आहेत. हार्दिक ही कामगिरी करणारा जगातील ९वा खेळाडू ठरला आहे.