मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या नव्या सीझनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. 5 वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा या हंगामात सामन्यातून बाहेर बसू शकतो. त्यांच्या जागी संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे आल्याचे वृत्त आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन रोहित शर्मावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने हे सर्व घेतले आहे. (rohit sharma may take rest in ipl 2023)
अधिक वाचा : IPL मॅचचे तिकीट खरेदी करण्याची सोपी पद्धत
इंडियन प्रीमियर लीगचा 16वा सीझन शुक्रवार 31 मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि 4 वेळचा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा हिट मॅन यावर्षी भारतात होणार्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून वर्कलोड मॅनेजमेंटवर काम करत आहे. यंदाच्या आयपीएलदरम्यान तो मुंबई इंडियन्ससाठी सामने निवडणार असून त्यानंतरच तो मैदानात उतरणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हा निर्णय कर्णधारासह संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव संघाची धुरा सांभाळणार आहे. नियमित कर्णधार डग आऊटमध्ये उपस्थित राहून संघाच्या निर्णयांना मदत करेल. रोहित शर्माच्या दिग्दर्शनाखाली सूर्यकुमार यादव मैदानावर संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे
अधिक वाचा : BCCI Annual Player Retainership : बीसीसीआयच्या नव्या करारानुसार हे 4 खेळाडू ए प्लस कॅटेगरीत राहणार
मुंबई इंडियन्सचा शेवटचा हंगाम अत्यंत निराशाजनक होता. संघ सलग 8 सामने गमावला होता आणि गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर होता. सीझनमध्ये सलग 8 सामने गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्ध पहिल्या विजयाची चव चाखली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. 2013 मध्ये त्याने पहिल्यांदा संघाला चॅम्पियन बनवले. यानंतर 2015 आणि 2017 मध्ये मुंबईने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. 2019 मध्ये आणि पुन्हा 2020 मध्ये, संघाने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला आणि 5 वे विजेतेपद मिळवले.