Rohit: नाकातून रक्त वाहत असतानाही फिल्डिंग करतोय रोहित

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 03, 2022 | 18:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma video:भारताचा कर्णधार रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. दरम्यान, फिल्डिंग करताना त्याची तब्येत खराब असल्याचे दिसत होते. त्याच्या नाकातून रक्त येतं होतं. 

rohit-karthik
Rohit: नाकातून रक्त वाहत असतानाही फिल्डिंग करतोय रोहित 
थोडं पण कामाचं
  • द. आफ्रिकेविरुद्ध रोहितच्या नाकातून वाहू लागलं रक्त
  • रोहित शर्मा काही ओव्हरसाठी मैदानातून गेला आणि राहुलने नेतृत्व केले
  • रोहित शर्माने मैदानाबाहेर जाण्याआधी सूचना केल्या

गुवाहाटी: भारतीय संघाने(indian team) द. आफ्रिकेला(south africa) दुसऱ्या टी-20 सामन्यात(t-20 match) 16 धावांनी मात दिली. भारतीय संघाने पहिल्यांदाच मायदेशात द. आफ्रिकेला टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत हरवले. गुवाहाटीमध्ये(guwahati) खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने(indian team) पहिल्यांदा फलंदाजी करत 237 धावा केल्या होत्या. मात्र प्रतिस्पर्धी संघाने चांगला खेळ करत सामन्याची रंगत वाढवली. भारतीय संघाने हा सामना 16 धावांनी जिंकला. द. आफ्रिकाने डेविड मिलर आणि क्विंटन डी कॉक यांच्या 174 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 221 धावा केल्या. मिलरने यासोबतच आपले दुसरे टी20 शतक पूर्ण केले. rohit sharma on fielding while bleeding nose

अधिक वाचा - दसऱ्याला करा 3 गोष्टींचे गुप्त दान; देवी आपोआप होईल प्रसन्न

भारतीय संघाची शेवटच्या ओव्हरमधील गोलंदाजी आजही चिंतेचा विषय बनला आहे. कारण तीन गोलंदाजांनी 11 पेक्षा जास्त धावा प्रति ओव्हर दिल्या. ही बाब कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर स्वीकारली. रोहित शर्माने फलंदाजांचे तोंडभरून कौतुक केले त्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये आपला चौथा सर्वात मोठा स्कोर केला. रोहित शर्माने फलंदाजीदरम्यान कमालीचे प्रदर्शन केले. मात्र फिल्डिंगदरम्यान त्याची वेळ काही चांगली नव्हती. 

एकदा ऋषभ पंतच्या ग्लव्हजमधन निसटलेला बॉल त्याच्या पोटाच्या खालच्या भागाला लागला. याशिवाय गुवाहाटीमधील उष्णतेनेही त्याच्यावर परिणाम केला. रोहित शर्माच्या नाकातून रक्त वाहू लागले.द. आफ्रिकेच्या डावाच्या 12व्या ओव्हरच्या सुरूवातीला ही घटना घडली. त्याला जेव्हा समजले की नाकातून रक्त येत आहे तेव्हा त्याने लगेचच रूमाल वापरला.

एकीकडे रोहित शर्मा रूमालाने नाक साफ करत होते तर दुसरीकडे संघाचे नेतृत्व करत होते. रोहित शर्माचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो रक्त साफ करत आहे आणि दुसरीकडे गोलंदाजांना सूचना देत आहे. अखेर जेव्हा रक्त काही थांबतच नव्हते तेव्हा त्याला मैदान सोडावे लागले. इतका त्रास होत असतानाही रोहितने आपली भूमिका सोडली नाही. 

अधिक वाचा - ‘या’ गोष्टींमुळे दहा दिवसांत वजन होईल कमी

यावेळेस शाहबाद अहमदने कर्णधार रोहित शर्माची जागा घेतली आणि उप कर्णधार केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले. दरम्यान, डावाच्या 15व्या ओव्हरआधी रोहित शर्मा पुन्हा मैदानावर आला आणि संघाचे नेतृत्व करू लागला. भारत आणि द. आफ्रिका यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना इंदूरमध्ये खेळवला जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी