मुंबई: टीम इंडिया(team india) आशिया कपमध्ये(asia cup) आपला दुसरा सामना हाँग काँगविरुद्ध खेळणार आहे. या मोठ्या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. या सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला होता. ३१ ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी खास असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने बाजी मारली तर तो एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करेल. rohit sharma one step away to create history
अधिक वाचा - सेक्स करण्यापूर्वी आधार पॅन बघण्याची गरज नाही - दिल्ली HC
रोहित शर्मा अँड कंपनी ३१ ऑगस्टला हाँगकाँगला चितपट करण्याच्या तयारीने मैदानात उतरेल. रोहित शर्माने आतापर्यंत ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी त्याने ३० सामन्यांत विजय मिळवला हे. जर टीम इँडियाने ३१ ऑगस्टच्या सामन्यात विजय मिळवला तर रोहित या फॉरमॅटमध्ये ३१वा विजय मिळवेल. सोबतच रोहित शर्मा ३१व्या विजयासह सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याच्या बाबतीत दुसरा भारतीय कर्णधार बनेल.
एक कर्णधार म्हणून टीम इंडियाला सर्वाधिक सामने जिंकून देण्याच्या लिस्टमध्ये रोहित शर्मा आता विराट कोहलीच्या बरोबरीत आहे. विराट कोहलीने ५० टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. यात त्याने ३० सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. रोहितने आणखी एक विजय मिळवल्यास तो विराट कोहलीला पछाडू शकतो. शर्माची नजर विराटच्या या रेकॉर्ड तोडण्यावर असणार आहे. भारतासाठी सर्वाधिक सामने महेंद्रसिंग धोनीने जिंकले आहेत. त्याने भारतासाठी ४२ टी-२० सामने जिंकलेत.
अधिक वाचा - कमाईत Six मारण्यासाठी Hardikकडे मोठं-मोठ्या ब्रँडची रांग
२७ ऑगस्ट शनिवार श्रीलंका वि अफगाणिस्तान
२८ ऑगस्ट रविवार भारत वि पाकिस्तान
३० ऑगस्ट मंगळवार बांगलादेश वि अफगाणिस्तान
३१ ऑगस्ट बुधवार भारत वि क्वालिफायर
१ सप्टेंबर गुरूवार श्रीलंका वि बांगलादेश
२ सप्टेंबर शुक्रवार पाकिस्तान वि क्वालिफायर
३ सप्टेंबर शनिवार बी १ वि बी २ सुपर ४
४ सप्टेंबर रविवार ए १ वि ए २ सुपर ४
६ सप्टेंबर मंगळवार ए १ वि बी १ सुपर ४
७ सप्टेंबर बुधवार ए २ वि बी २ सुपर ४
८ सप्टेंबर गुरूवार ए १ वि बी २ सुपर ४
९ सप्टेंबर शुक्रवार बी १ वि ए २ सुपर ४
११ सप्टेंबर रविवार फायनल सामना
सर्व सामने संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतील.