Rohit Sharma out of Bangladesh tour due to injury, Deepak Chahar and Kuldeep Sen will not play in the third ODI : बांगलादेश विरुद्धच्या 3 वन डे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला. टीम इंडिया बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या दोन मॅचमध्ये हरली. यानंतर तिसऱ्या मॅचसाठी टीममध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय झाला आहे.
भारत वि. बांगलादेश दुसरी वन डे स्कोअरकार्ड
हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे बांगलादेशमधील उर्वरित दौऱ्यातून कॅप्टन रोहित शर्मा बाद झाला आहे. रोहितच्या हाताच्या बोटाचे हाड मोडले आहे. यामुळे तो बांगलादेश विरुद्धची तिसरी वन डे आणि नंतर होणार असलेल्या 2 टेस्ट खेळणार नाही. हॅमस्ट्रिंगमुळे दीपक चहर आणि पाठीच्या दुखण्यामुळे कुलदीप सेन तिसऱ्या वन डे मॅचमध्ये खेळणार नाही.
टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड याने रोहित शर्माच्या दुखापतीबाबत माहिती दिली. रोहितच्या हाताच्या बोटाच्या हाडाला दुखापत झाली आहे. टाके घालून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. हाडाला फ्रॅक्चर झालेले नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून रोहित पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्यासाठी मुंबईला रवाना होत असल्याची माहिती राहुल द्रविडने दिली. दुखापतीमुळे दीपक चहर आणि कुलदीप सेन तिसऱ्या वन डे मॅचमध्ये खेळणार नाही; असेही द्रविडने सांगितले.
दुसऱ्या वन डे मॅचमध्ये दुखापतीमुळे रोहित शर्मा उपचार करून घेतल्यानंतर नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. याआधी हॅमस्ट्रिंगमुळे दीपक चहर त्याच्या कोट्याच्या फक्त 3 ओव्हर टाकू शकला. यामुळे भारताच्या दुसऱ्या वन डे मॅचच्या नियोजनावर परिणाम झाला. चहरला दुखापत होण्याची 4 महिन्यांतली ही तिसरी घटना आहे. यामुळे चहरच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे कुलदीप सेन पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या वन डे मॅचमध्ये खेळू शकला नाही. तो तिसऱ्या वन डे मॅचमध्येही खेळणार नाही.
तीन खेळाडूंच्या गैरहजेरीत टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध आधी तिसरी वन डे मॅच खेळेल. नंतर 2 टेस्ट मॅच खेळेल. तिसऱ्या वन डे मॅच मध्ये व्हाइट वॉश टाळण्यासाठी भारताला जिंकणे आवश्यक आहे. यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष आहे.