[VIDEO]रवींद्र जडेजासोबत रोहित शर्माचं हेड्स अप चॅलेन्ज, बघा मजेशीर व्हिडिओ

रोहित शर्मानं रवींद्र जडेजासोबत हेड्स अप चॅलेन्ज पूर्ण करत आहे. रोहितनं आपल्या हातात एक कार्ड पकडलं आहे, ज्यावर खेळाडूचं नाव लिहिलं होतं. रोहित हा कार्ड बघू शकत नाहीय. बघा हा मजेशीर व्हिडिओ. 

Rohit and jaddu
[VIDEO]रवींद्र जडेजासोबत रोहित शर्माचं हेड्स अप चॅलेन्ज, बघा मजेशीर व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रोहित शर्मानं रवींद्र जडेजासोबत केलं हेड्स अप चॅलेन्ज
  • एक मिनिटांचा दोघांचा मजेशीर व्हिडिओ
  • रवींद्र जडेजानं केली विराट कोहली, बुमराहची नक्कल

जॉर्जटाउन:  हिटमॅन रोहित शर्मानं रवींद्र जडेजा सोबत हेड्स अप चॅलेन्ज घेतले आहे. या चॅलेन्जचा मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(बीसीसीआय) नं आपल्या अधिकृ ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो फॅन्सना खूप आवडतो आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता की, रोहित शर्मानं रवींद्र जडेजाकडून हेड्स अप चॅलेन्ज घेतलं आहे. रोहितनं आपल्या हातात एक कार्ड पकडलं आहे. ज्यावर खेळाडूचं नाव लिहिलं होतं. रोहित हे कार्ड बघू शकत नाही. रवींद्र जडेजाला त्या खेळाडूचं नाव वाचून त्याची एक्टिंग करून दाखवायची होती. 

रोहित शर्मानं सर्वांत पहिलं कार्ड उचललं, त्यात बॉलर जसप्रीत बुमराहचं नाव होतं. रवींद्र जडेजानं बुमराहच्या बॉलिंगची अॅक्शन करत नक्कल केली. जे हिटमॅननं सहज ओळखलं. बुमराहचं नाव ओळखल्यानंतर रोहित शर्मानं म्हटलं की, इतकं सोपं नाव की दिला भावा, थोडं तरी कठिण असू दे. त्यानंतर भारतीय ओपनरनं आपल्या डोक्यावर दुसरं कार्ड घेतलं. 

रोहितनं हातात कार्ड दाखवल्यानंतर जडेजा हसू लागला. रोहितनं म्हटलं की, हसतो काय, अॅक्टिंग करून सांग. खरंतर या कार्डमध्ये कॅप्टन विराट कोहलीचं नाव लिहिलं होतं. हल्लीच मीडियामध्ये चर्चा होती की, विराट आणि रोहित यांच्यामध्ये काही कुरघोड्या सुरू आहेत. अशातच रोहितच्या हातात विराटच्या नावाचं कार्ड बघून जडेजा आपलं हसू रोखू शकला नाही. 

त्यानंतर जडेजानं कॅप्टन कोहलीच्या बॅटिंगच्या अंदाजात नक्कल केली. जडेजानं बॅट हातात फिरवण्याची स्टाईल दाखवली आणि हेल्मेटवर दोन वेळा हातानं ठिक करण्याचा इशारा केला. रोहितनं उत्तर देताना सुरूवातीला म्हटलं की, कोणी बॅट्समन आहे. बॉल सोडण्याचा इशारा दाखवल्यानंतर म्हटलं की वेल लेफ्ट. शेवटी त्यांनं योग्य खेळाडू ओळखून विराट कोहलीचं नाव घेतलं. मागे बसलेल्या कोहलीनं जडेजा विचारलं की, कसं ओळखलं. तेव्हा ऑलराऊंडरनं उत्तर दिलं की, बॅटिंगची शैली सांगितली. 

याआधी पहिले शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांचा मजेशीर व्हिडिओ समोर आला होता. दोन्ही खेळाडूंना माउथपीस दिलं होतं. जे घातल्यानंतर तोंड बंद होतं नव्हतं. त्यानंतर दोघांना काही डायलॉग दिले गेले, जे समोरच्याला ओळखायचे होते. सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. सप्टेंबरपर्यंत हा दौरा चालणार आहे.

याआधी रोहित शर्मानं रिषभ पंतची मुलाखत घेतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यात व्हिडिओमध्ये सुरूवातीलाच रोहित शर्मा रिषभ पंतचं नाव चुकवतो. व्हिडिओत रोहित शर्मा बोलतो आपल्यासोबत आहेत, रिषभ संत..त्यानंतर पटकन बोलतो सॉरी..सॉरी आपल्यासोबत आहेत रिषभ पंत..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
[VIDEO]रवींद्र जडेजासोबत रोहित शर्माचं हेड्स अप चॅलेन्ज, बघा मजेशीर व्हिडिओ Description: रोहित शर्मानं रवींद्र जडेजासोबत हेड्स अप चॅलेन्ज पूर्ण करत आहे. रोहितनं आपल्या हातात एक कार्ड पकडलं आहे, ज्यावर खेळाडूचं नाव लिहिलं होतं. रोहित हा कार्ड बघू शकत नाहीय. बघा हा मजेशीर व्हिडिओ. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...