रोहित शर्माचे आलिशान घर, या फोटो आणि व्हिडिओमधून पाहा हिटमॅनची 30 कोटी किंमतीची अपार्टमेंट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 06, 2021 | 13:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

रोहित शर्माचे ड्रीम हाऊस असणारे हे घर अहुजा टॉवर्सच्या 29व्या मजल्यावर आहे. इथे पाहा त्याच्या घराचे कमाल फोटो आणि व्हिडिओ आणि भारतीय क्रिकेट संघातल्या हिटमॅनच्या 30 कोटींच्या घराच्या ऑनलाईन सहलीची मजा घ्या.

Rohit Sharma
रोहित शर्माचे आलिशान घर, या फोटो आणि व्हिडिओमधून पाहा हिटमॅनची 30 कोटी किंमतीची अपार्टमेंट  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रोहित अनेकदा शेअर करतो घराचे फोटो आणि व्हिडिओ
  • घ्या रोहित शर्माच्या महागड्या, आलिशान घराची सहल
  • रोहितच्या घरातून दिसते अरबी समुद्राचे सुंदर दृष्य

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) उपकर्णधार (vice captain) आणि मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाचा महत्त्वाचा भाग असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) एक उत्तम क्रिकेटपटू आहे. भारतीय संघाचा सलामीवीर (opening batman) म्हणून जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेल्यानंतर तो भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग (inevitable part) झाला आहे. इथे पाहा रोहित शर्माच्या मुंबईच्या (Mumbai) 30 कोटी किंमतीच्या आलिशान घराचे (luxurious house) फोटो (photos) आणि व्हिडिओ (videos).

 

रोहित अनेकदा शेअर करतो घराचे फोटो आणि व्हिडिओ

आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय फलंदाजीच्या अग्रक्रमी असणारा रोहित शर्मा आपली पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा यांच्यासह मुंबईत राहतो. त्याने वरळी भागात एक महागडी अपार्टमेंट नुकतीच विकत घेतली आहे. सोशल मीडियावरही त्याचे प्रचंड फॅन फॉलोविंग आहे आणि आपल्या घराचे फोटो आणि व्हिडिओ तो अनेकदा शेअर करत असतो.

 

घ्या रोहित शर्माच्या महागड्या, आलिशान घराची सहल

क्रिकेट आणि चित्रपटांव्यतिरिक्त रोहितला आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या या घरी वेळ घालवायला आवडते. आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितने दोन वर्षांपूर्वी तब्बल 30 कोटी रुपये मोजून 6,200 चौरस फुटांचे हे घर विकत घेतले होते. इथे पाहा या घराचे काही फोटो आणि व्हिडिओ जे तुम्हाला घरबसल्या रोहितच्या घराची सफर घडवून आणतील.

रोहितच्या घरातून दिसते अरबी समुद्राचे सुंदर दृष्य

द इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार रोहितला त्याच्या स्वप्नातल्या घराच्या चाव्या 2015 साली मिळाल्या जेव्हा त्याने रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. रोहितच्या वरळी भागातल्या या घरातून अरबी समुद्राचा 270 अंशाचा देखावा दिसतो. त्याची ही अपार्टमेंट अहुजा टॉवर्सच्या 29व्या मजल्यावर आहे. एकूण 53 मजले असलेले अहुजा टॉवर्स हे मुंबईतील सर्वाधिक महागड्या रहिवासी इमारतींपैकी एक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी