मुंबई: भारताचा कर्णधार रोहित शर्माला(team india captain rohit sharma) जाणवले की टी-२० वर्ल्डकपच्या(t-20 world cup) मागील टप्प्यात चांगला निकाल न मिळण्यामागचे कारण हे नाही की भारत(india) खराब क्रिकेट खेळत आहे आणि त्यांच्या मानसिकतेत कोणती कमतरता आहे. २००७मध्ये वर्ल्डकपच्या पहिल्याच भागात भारत ट्रॉफी जिंकला होता. त्यानंतर एकदाही टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला ट्रॉफी जिंकता आलेली नाही.(Rohit sharma says about team about t-20 world cup)
अधिक वाचा - 1 ऑगस्टपासून होतायत अनेक बदल
संयुक्त अरब अमिरातमध्ये गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला विजेता म्हणून पाहिले जात होते. मात्र भारत सुपर १०मधून लवकर बाहेर पडला. आम्हाला वर्ल्डकपमध्ये चांगला निकाल मिळू शकला नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही इतक्या वर्षांपासून खराब क्रिकेट खेळत आहोत. मी या गोष्टीशी सहमत नाही की आम्ही चांगले क्रिकेट खेळत नाही आहोत.
रोहितने सांगितले, आम्ही वर्ल्डकपमध्ये चांगले खेळलो नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही स्वतंत्रपणे खेळत नाही आहेत. नुकतेच आम्ही खेळाडूंना स्वातंत्र्य दिले की ते कोणत्याही दबावाशिवाय आपला स्वभाविक खेळ खेळावा. जर ते स्वतंत्रपणे खेळत असतील तर त्याचे निकाल समोर येतील.
रोहितने मान्य केले की भारतीय संघात काही अशा कमतरता आहेत ज्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्डकपसाठीच्या तयारीपर्यंत भरण्याची गरज आहे. त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत खेळाडूंना स्वतंत्रपणे खेळण्यासाठी सांगितले. जसे की ते आपले राज्य अथवा फ्रेंचायझी संघासाठी खेळतात.
अधिक वाचा - समंथानं खरेदी केलं EX पतीचं घर, केली कोट्यवधींची डील
वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला. या मालिकेत भारताने ३-० असे निर्भेळ यश मिळवले. या मालिकेत भारताच्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारताने हा विजय मिळवला.