MIमध्ये जे शिकवलं ते माझ्याच विरुद्ध वापरलं, रोहित म्हणाला...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 18, 2021 | 16:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

INDvs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन टी २० मॅचच्या मालिकेतील पहिली मॅच भारताने जिंकली. जयपूरमध्ये झालेली ही मॅच भारताने पाच विकेट राखून जिंकली.

rohit sharma
MIमध्ये जे शिकवलं ते माझ्याच विरुद्ध वापरलं, रोहित म्हणाला.. 
थोडं पण कामाचं
  • रोहित आणि ट्रेंट बोल्ट दोघेही टीम मुंबई इंडियन्ससाठी खेळतात
  • रोहित शर्मा आपल्या खेळीदरम्यान चांगला खेळ करत होता मात्र ट्रेंट बोल्टने त्याला आऊट करण्यासाठी स्लो बाऊंसर फेकला
  • रोहित शर्माने सांहितले की ट्रेंट बोल्टने त्याला मूर्ख बवण्याचा प्रयत्न केला

मुंबई: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या(t-20 captain rohit sharma) पूर्णवेळ कप्तानीची सुरूवात खूपच चांगली झाली आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या(new zealand) जयपूर(jaipur) येथे तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने शानदार पद्धतीने जिंकला. बुधवारी सवाई मानसिंह स्टेडियममध्ये झालेला हा सामना खूपच रोमहर्षक झाला. भारताने या सामन्यात ५ विकेटनी विजय मिळवला. रोहित शर्माने या सामन्यात ४८ धावांची खेळी केली. रोहित चांगला खेळ करत असताना ट्रेंट बोल्टने त्याला बाद केले. rohit sharma says about trent bolt

बोल्टने रोहितला चकवले

रोहित आणि ट्रेंट बोल्ट दोघेही टीम मुंबई इंडियन्ससाठी खेळतात आणि एकमेकांचे सहकारी आहेत. त्यांच्याच संघातील आणखी एक सहकारी यात चमकला. तो म्हणजे सूर्यकुमार यादव. त्याने ६२ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवचीही बोल्टनेच विकेट घेतली. मात्र ऋषभ पंत अखेरपर्यतं नाबाद राहिला. त्याने १७ चेंडूत ७० धावांची खेळी करत त्याने कोणताही धांदरटपणा दाखवला नाही. यामुळे भारताला शेवटच्या षटकात १० धावा करता आल्या. 

रोहित शर्मा आपल्या खेळीदरम्यान चांगला खेळ करत होता मात्र ट्रेंट बोल्टने त्याला आऊट करण्यासाठी स्लो बाऊंसर फेकला ज्यामुळे त्याच्या खेळीचा अंत झाला. रोहितने या स्लो बाऊंसरला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हिट करण्याचा प्रयत्न केला मात्र बॉल डीप मिडविकेट फिल्डकरकडे गेला. 

रोहित म्हणाला.- मला माहीत होते की बोल्ट काय करणार आहे ते

रोहित शर्माने सांहितले की ट्रेंट बोल्टने त्याला मूर्ख बवण्याचा प्रयत्न केला कारण रोहित मुंबई इंडियन्सच्या स्पर्धेदरम्यान बोल्टसोबत अशाच प्रकारच्या गोष्टींची चर्चा करत असतो आणि वेगवान गोलंदाजाने तेच काम त्याच्याविरोधात वापरले. रोहित म्हणाला, आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहोत. मी कुठे कमकुवत आहे अथवा त्याच्या ताकदीच्या कोणत्या बाजू आहेत याची माहिती आम्हाला आहे. जेव्हा मी त्याच्यासमोर नेतृत्व करत असतो तेव्हा मी नेहमीच सांगतो की फलंदाजाला थोडासा मूर्ख बनवा आणि माझ्यासोबतही त्याने हेच केले. '

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक

  1. बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ - पहिली टी २०, जयपूर - संध्याकाळी ७ वा. - भारत ५ विकेट राखून विजयी
  2. शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१ - दुसरी टी २०, रांची - संध्याकाळी ७ वा.
  3. रविवार २१ नोव्हेंबर २०२१ - तिसरी टी २०, कोलकाता - संध्याकाळी ७ वा.
  4. गुरुवार २५ नोव्हेंबर ते सोमवार २९ नोव्हेंबर २०२१ - पहिली टेस्ट, कानपूर - सकाळी ९.३० वा.
  5. शुक्रवार ३ डिसेंबर ते मंगळवार ७ डिसेंबर २०२१ - दुसरी टेस्ट, मुंबई - सकाळी ९.३० वा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी