मुंबई: भारतीय क्रिकेटचा वनडे आणि टी-२० फॉरमॅटचा(one day and t-20 captain rohit sharma) कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माने जबाबदारी सांभाळण्याबाबत खुलेपणाने बोलला आहे. रोहितने वर्ल्डकप(world cup, rahul dravid), राहुल द्रविड आणि माजी कर्णधार विराट कोहलीबाबत आपले मतत मांडले आहे. नवा कर्णधार रोहित शर्माने माजी कर्णधार विराट कोहलीचे जोरदार कौतुक केले आणि एक फलंदाज म्हणून संघातील त्याचे किती महत्त्व आहे हे ही सांगितले. rohit sharma says about virat kohli
बीसीसीआयने दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्माने विराट कोहलीबाबत सांगितले, विराट कोहलीने संघाचे नेतृत्व खूप चांगले केले आहे आणि आता संघ अशा जागी आहे जिथे पाठी वळून पाहू शकत नाही. विराटच्या नेतृत्वात एकच संदेश होता की आपल्याला जिंकण्यासाठी खेळायच आहे. कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, मी विराटसोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. तेव्हापासून आतापर्यंत मला खूप मजा आली. आम्ही एक टीम म्हणून नक्कीच पुढे जात राहू आणि चांगले करण्याा प्रयत्न करू.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जेव्हा भारताच्या कसोटी संघाची घोषणा झाली होती तेव्हा वनडे कर्णधार बदलल्याीही घोषणा करण्यात आली. टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहलीने टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. न्यूझीलंड मालिकेपासून संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.
आता वनडे कर्णधारपद रोहितच्या हाती आले आहे. रोहित शर्माने टी-२० कर्णधारपद सांभाळल्यानंतर विराट कोहलीबाबत विधान केले होते. रोहितने म्हटले होते की विराट जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. तो संघातील एक लीडरआहे. अशातच त्याची फलंदाज म्हणून संघातील भूमिका महत्त्वाची आहे. आप्ल्या मुलाखतीत रोहित शर्माने कोच राहुल द्रविडबाबतही सांगितले होते. तसेचा आगामी वर्ल्डकपचाही प्लान सांगितला होता.