Rohit Sharma: रोहित शर्माच्या सिक्सने चिमुकली झाली जखमी, रोहितने केले असे काही...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 13, 2022 | 14:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय संघाने पहिल्या वनडेत इंग्लंडला १० विकेटनी मात दिली. सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावांची खेळी केली. यात त्याने ५ सिक्स मारले. 

rohit sharma
रोहित शर्माच्या सिक्सने चिमुकली झाली जखमी, रोहितने केले असे  
थोडं पण कामाचं
  • तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने पुढे
  • पहिल्या सामन्यात बुमराहने मिळवल्या

मुंबई: रोहित शर्माच्या(rohit नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच घरात मात दिली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिला सामना मंगळवारी ओव्हलमध्ये खेळवण्यात आला. यात टीम इंडियाने १० विकेटनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. rohit sharma six hit to girl who sit in the stadium

अधिक वाचा - प्रवासी बस पुराच्या पाण्यात अडकली,प्रवाशांच्या सुटकेचा VIDEO

सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये दिसला. त्याने लांबच्या लांब सिक्स मारले आणि नाबाद ७६ धावांची खेळी केली. रोहितने आपल्या डावात ५ लांब सिक्स मारले. या दरम्यान एक असा सिक्स ठोकला ज्यामुळे स्टँडमध्ये बसलेली एक चिमुकली दुखापतग्रस्त झाली. तो बॉल त्या मुलीला लागला. 

रोहितच्या हुक शॉटवर मुलगी झाली दुखापतग्रस्त

या मुलीचे नाव मीरा

ही घटना भारताच्या डावादरम्यान पाचव्या ओव्हरमध्ये घडली. वेगवान गोलंदाज डेविड विलीने आपल्या ओव्हरचच्या तिसरा बॉल खूप शॉर्ट टाकला होता ज्यावर रोहित शर्माने हुक शॉट मारत बॉलला लेग साईडला सिक्स मारत पाठवले. हा बॉल स्टँडमध्ये एका मुलीला लागला. बॉल लागल्यानंतर तिला आसपासचे लोक तिला सांभाळू लागले. मुलीसोबत तिचे वडील होते त्यांनी तिला मिठी मारली. 

अधिक वाचा - 'आज बाळासाहेब असते तर...', राऊतांनी सुनावलं!

सोशल मीडियावर रोहितचा सिक्स आणि मुलीला दुखापतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याशिवाय काही आणखीही पोस्ट व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात आलाय की या मुलीचे नाव मीरा आहे. तिचे वय ६ वर्षे आहे. तिला बॉल लागला होता. मात्र आता ती ठीक आहे. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की मुलीला बॉल लागल्यानंतर मेडिकल स्टाफही तिला त्याच पद्धतीने ट्रीटमेंटसाठी धावले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी