रोहितच्या सिक्सने फोडले क्रिकेट चाहत्याचे नाक, रुग्णालयात दाखल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 14, 2022 | 12:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर दुर्घटना पाहायला मिळाली. खेळादरम्यान एक प्रेक्षकाच्या नाकाला जोरात टाकले. 

rohit sharma
रोहितच्या सिक्सने फोडले क्रिकेट चाहत्याचे नाक 
थोडं पण कामाचं
  • रोहितच्या सिक्सरने प्रेक्षकाला दुखापत
  • पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी घडली घटना
  • टीम इंडिया विजयापासून ९ विकेट दूर

मुंबई: भारत आणि श्रीलंका(india vs srilanka) यांच्यातील डे-नाईट कसोटीच्या(day-night test) पहिल्या दिवशी रोहित शर्माने(rohit sharma) मारलेला सिक्सर(sixer) खूपच धोकादायक ठरला. त्याच्या या सिक्सरमुळे स्टेडियममध्ये बसलेल्या एका प्रेक्षकाच्या नाकाचे हाड तुटले. सामन्याच्या ६व्या ओव्हरमध्ये विश्वा फर्नांडोच्या बॉलवर रोहितने पुल शॉट मारला आणि षटकार ठोकला. डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार हा बॉल सामना पाहत असलेला क्रिकेट चाहता २२ वर्षीय गौरव विकासच्या नाकावर लागला आणि त्याच्या हाडाला हेअरलाईन फ्रॅक्चरसह कटही लागला. 

अधिक वाचा - या तारखांना जन्मलेली लोक भाग्यवान असतात

तातडीने नेले हॉस्पिटलमध्ये 

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने गौरवला पहिल्यांदा मेडिकल रूममध्ये नेत प्रथमोपचार केले आणि त्याला तातडीने हॉस्पिटलला नेले. येथे त्याला टाके लावण्यात आले. याबाबत डेक्कन हेराल्डने गौरवचा भाऊ राजेशने सांगितले की डॉक्टरांनी काही दिवसानंतर टाके काढण्यास सांगितले आहे. 

पहिल्या डावात सलामीवीर फ्लॉप

बंगळुरूमध्ये खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत रोहित शर्माने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये मयांक अग्रवाल ४ धावांवर बाद झाला. मयंकची विकेट वेगळ्याच अंदाजात पडली. आधी त्याच्याविरोधात एलबीडब्लूचे अपील करण्यात आले मात्र अंपायरने त्याला नॉट ऑऊट दिला. बॉल ऑफ साईडला होता आणि यातच मयांक रन काढण्यासाठी धावला. रोहित शर्माही धावला मात्र त्याने मयांकला धावा करण्यास नकार दिला. यातच पॉईंटच्या फिल्डने वेगाने बॉल उलत कीपच्या दिशेने फेकला आणि मयांक रनआऊट झाला. 

रोहित शर्माही मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरला. त्याने २५ बॉलमध्ये १५ धावा केल्या हिटमॅनची विकेट लसिथ एम्बुलडेनियाने घेतली. मोहाली कसोटीत रोहित केवळ २९ धावा करून परतला होता. रोहित शर्मा पहिल्यांदा कसोटीत नेतृत्व करत आहे. पहिल्या सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी करत श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी हरवले होते. तसेच याआधी खेळवण्यात आलेल्या टी-२० मालिकेतही श्रीलंकेला क्लीन स्वीप केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी