India vs New zealand : भारताने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत घेतला बदला, रोहितच्या विधानाने खळबळ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 22, 2021 | 13:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New zealand: न्यूझीलंड तोच संघ आहे ज्याने गेल्या महिन्यात भारताला ८ विकेटनी हरवत टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर ढकलले होते. 

india vs new zealand
IND vs NZ:न्यूझीलंडविरुद्ध विजयानंतर रोहितच्या विधानाने खळबळ 
थोडं पण कामाचं
  • रोहितच्या या विधानाने खळबळ
  • विजयात या फलंदाजांची मुख्य भूमिका
  • भारताने न्यूझीलंडचा सुपडा केला साफ

कोलकाता: भारताने(india) न्यूझीलंडविरुद्धच्या(new zealand) तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात(t-20 match) ३-०ने विजय मिळवत न्यूझीलंडचा सुपडाच साफ केला. न्यूझीलंड तोच संघ आहे ज्यांनी गेल्या महिन्यात भारताला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत(t-20 world cup) ८ विकेटनी हरवत भारताला स्पर्धेतून बाहेर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता भारताने आपल्याच घरात न्यूझीलंडला क्लीनस्वीप केले. सोबतच टी-२० वर्ल्डकपच्या पराभवाचा बदला घेतला. दरम्यान, विजयानंतर रोहितच्या(rohit sharma) विधानाने खळबळ माजली आहे. rohit sharma statement after match win against new zealand

रोहितचे खळबळजनक विधान

या सामन्यात दीपक चाहरने ८ बॉलवर २१ धावा ठोकत भारताचा स्कोर १८४ धावांवर पोहोचवला. या मोठ्या स्कोरमुळे भारताला न्यूझीलंडला ७३ धावांनी हरवता आले. विजयानंतर रोहित शर्माने म्हटले की आठव्या आणि नवव्या क्रमांकावरील फलंदाज विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जर तुम्ही जगभरातील टीम्स पाहिल्या तर त्यांच्याकडे खालच्या क्रमांकावरही चांगली फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. 

विजयात या फलंदाजांची मुख्य भूमिका

रोहित शर्मा ५६ धावांची खेळी करत भारताला चांगली सुरूवात करून दिलली. मात्र भारताची मधली फळी अडखळली. अशातच शेवटच्या क्रमांकावरील फलंदाजांनी चांगली कामगिरी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. अखेरच्या ५ ओव्हरमध्ये भारताने ५० धावा केल्या. यात भारताने सात बाद १८४ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडला ११ धावांवर बाद केले. 

रोहित सामन्यानंतर म्हणाला, आम्ही मधल्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करू शकलो असतो. मात्र आमच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे मी खुशआहे. जर जगभरातल्या टीम्स पाहिल्या तर त्यांच्याकडे खालच्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. हर्षल पटेल जेव्हा हरयाणासाठी खेळतो तेव्हा डावाची सुरूवात करतो. दीपक चाहरबाबत आम्हाला माहिती आहे की त्याने श्रीलंकेत चांगली फलंदाजी केली होती. 

कसोटीत कोण मारणार बाजी

आता संघाने टी-२० मालिका आपल्या नावावर केली आहे. आता त्याची नजर कसोटी सामन्यांवर आहे. संघाने T20 मध्ये क्लीन स्वीप केल्याप्रमाणे आता संघाला 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतही न्यूझीलंडचा क्लीन स्वीप करायचा आहे. 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये कसोटी सामने सुरू होणार आहेत. इतक्या वाईट रीतीने हरल्यानंतर न्यूझीलंडचा संघ कसा पुनरागमन करतो हे पाहणे रंजक ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी