T20 World Cup: विराट कोहलीच्या शत्रूंना रोहितने दिले सडेतोड उत्तर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 03, 2022 | 17:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma Statement: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध टी20 वर्ल्ड कप 2022च्या सामन्यानंतर विराट कोहलीच्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. 

rohit-virat
विराट कोहलीच्या शत्रूंना रोहितने दिले सडेतोड उत्तर 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध टी20 वर्ल्ड कप 2022च्या सामन्यात विजयानंतर विराट कोहलीचे शत्रू आणि त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले.
  • विराट कोहलीला फॉर्म परत मिळवण्यासाठी अशाच काही खेळींची गरज होती.
  • विराट कोहलीने आशिया कप 2022मध्ये बऱ्याच जबरदस्त खेळी केल्या.

मुंबई: भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहली(virat kohli) सध्या आपल्या करिअरमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. विराट कोहली टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये(t-20 world cup 2022) सर्वाधिक दावा करणारा फलंदाज बनला आहे. विराट कोहलीने टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक 220 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या टी20 वर्ल्ड कपमध्ये तीन अर्धशतके ठोकली आहेत. तर पाकिस्तान(pakistan) आणि बांगलादेशविरुद्द(bangladesh) टी20 वर्ल्ड कप सामन्यात त्ायाने मॅन ऑफ दी मॅचचे अवॉर्डही आपल्या नावे केले आहेत. rohit sharma take a dig o n virat kohli enemy

अधिक वाचा - सईने शेअर केलेल्या फोटोतील 'तो' कोण?

कोहलीच्या शत्रूंना दिले सडेतोड उत्तर

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध टी20 वर्ल्ड कप 2022च्या सामन्यात विजयानंतर विराट कोहलीचे शत्रू आणि त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले. विराट कोहलीने विरोधकांवर निशाणा साधताना भारताचा कर्णधार रोहित शर्ममा म्हणाला, विराट कोहली कधीच आऊट ऑफ फॉर्म नव्हता. 

रोहितने दिले हे उत्तर

रोहित शर्मा पुढे म्हणाला, विराट कोहलीला फॉर्म परत मिळवण्यासाठी अशाच काही खेळींची गरज होती. विराट कोहलीने आशिया कप 2022मध्ये बऱ्याच जबरदस्त खेळी केल्या. याशिवाय यो यावेळेस वर्ल्डकपमध्ये ज्या फॉर्मात आहे तो शानदार आहे. आम्हाला कधीच विराट कोहलीच्या प्रतिभेवर शंका नव्हती. 

कोहली जबरदस्त फॉर्मात

यावर्षी विराट कोहली खूपच धोकादायक फॉर्मात आहे. विराट कोहलीने आतापर्यंत या वर्षी 18 टी20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 58.75च्या सरासरीने 705 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या दरम्यान 1 शतक आणि 7 अर्धशतक ठोकले आहेत. टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये विराट कोहलीचा बेस्ट स्कोर नाबाद 122 राहिाला आहे. त्याने या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळवण्यात आलेल्याआशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकले होते. 

अधिक वाचा - चहाच्या टपरीवर कटिंग पिण्यासाठी सचिन तेंडूलकर भेटतो तेव्हा…

किंग कोहली

कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नाबाद 64 धावा ठोकल्या. विराट कोहली टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धााव करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने महेला जयवर्धनेला मागे टाकले. महेला जयवर्धनेने टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक 1016 धावा केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी