रोहित शर्माची तुफान फटकेबाजी, झळकावली पहिली डबल सेंच्युरी

IND vs SA, 3rd Test: टीम इंडियाचा हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्माने रविवारी आपल्या टेस्ट करिअरमधील पहिली डबल सेंच्युरी झळकावली आहे. रोहितने यापूर्वी वन डे मॅचमध्ये तीन डबल सेंच्युरी केल्या आहेत.

Rohit Sharma
रोहित शर्मा (फोटो सौजन्य: @BCCI)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रोहित शर्माची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डबल सेंच्युरी
  • टेस्ट क्रिकेटमधील पहि​ली डबल सेंच्युरी
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितची दमदार इनिंग 
  • सीरिजमधील ही तिसरी टेस्ट सेंच्युरी आहे तर टेस्ट करिअरमधील सहावी सेंच्युरी

रांची: टीम इंडियाचा हिटमॅन अर्थात रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये तुफान फटकेबाजी करत डबल सेंच्युरी केली आहे. रांची येथे टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरिजमधील तिसरी टेस्ट मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये रोहित शर्माने डबल सेंच्युरी केली आहे. ही डबल सेंच्युरी रोहित शर्माची टेस्ट करिअरमधील पहिली डबल सेंच्युरी ठरली आहे. 

रोहित शर्माने 255 बॉल्समध्ये 212 रन्सची शानदार इनिंग खेळली आहे. या इनिंगमध्ये रोहितने 28 फोर आणि 6 सिक्सर लगावले. खास बाब म्हणजे या इनिंगमधील सेंच्युरी आणि डबल सेंच्युरी सुद्धा रोहितने सिक्सर लगावून पूर्ण केली. रोहित शर्माचं यंदाच्या सीरिजमधील ही तिसरी टेस्ट सेंच्युरी आहे तर टेस्ट करिअरमधील सहावी सेंच्युरी आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे सुरु असलेल्या या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये रोहित शर्माने 183 रन्स पूर्ण करताच त्याने तीन टेस्टच्या चार इनिंगमध्ये 500 रन्स पूर्ण केले. 14 वर्षांनंतर भारतीय क्रिकेटरने एका सीरिजमध्ये पाचशे रन्सचा आकडा पार केला आहे. यापूर्वी 2005 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये वीरेंद्र सेहवाग याने 544 रन्स केले होते.

रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ओपनर म्हणून उतरला आहे. विशाखापट्टनम टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने दोन इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावल्या होत्या. त्यापैकी एका इनिंगमध्ये 176 रन्स तर दुसऱ्या इनिंगमध्ये 127 रन्सची इनिंग खेळली होती.

वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्येही डबल धमाका

वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी झळकावणारा रोहित शर्मा हा क्रिकेट विश्वातील चौथा आणि तिसरा भारतीय क्रिकेटर ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल या बॅट्समननेच हा कारनामा केला आहे. त्यानंतर आता या यादीत रोहित शर्माचं नाव जोडलं गेलं आहे. तर, ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवाग असे दोन बॅट्समन आहेत ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी तर वन-डे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी लगावली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी