Rohit Sharma: रोहित शर्मा बनणार टी-२० कॅप्टन, विराट करणार न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये आराम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 09, 2021 | 19:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma and virat kohli: रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात येऊ शकते. 

rohit sharma
रोहित शर्मा बनणार टी-२० कॅप्टन, विराट करणार आराम 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी, ३ वनडे आणि ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. 
  • दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बुमराह, शमीसह अनेक खेळाडूंना मिळू शकतो आराम
  • श्रेयस अय्यरचे होऊ शकते पुनरागमन, दीपक आणि राहुल चाहरलाही मिळू शकते संधी

Rohit Sharma wil be caption T20 and 1st Test । मुंबई: पुढील एक ते दोन दिवसांत न्यूझीलंडविरुद्ध(new zealand) टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची(team india) घोषणा केली जाणार आहे. याआधीच विविध अटकळी बांधल्या जात आहेत. असं म्हटलं जातयं की भारतीय क्रिकेटमध्ये खूप बदल दिसू शकतात. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला(rohit sharma) न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा कर्णधार(indian captain) केला जाऊ शकतो. यासोबतच शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते.  (Rohit Sharma will be captain for t-20 series against new Zealand)

सध्याचा कसोटी कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीतून ब्रेक घेत आहे आणि तो मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी संघात असेल. आशा आहे की कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतही खेळणार नाही. सध्याचा उपकर्णधार जो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत फॉर्ममध्ये नव्हता तो उपकर्णधारपदी कायम राहणार आहे. टी-२० मालिकेसाटी लोकेश राहुलला संघात उपकर्णधार बनवले जाऊ शकते. जयपूर, रांची आणि कोलकातामध्ये पहिले तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहे. तर कानपूर आणि मुंबईमध्ये मालिकेतील दोन कसोटी सामन होणार आहेत. 

बुमराह, शमीला दिला जाऊ शकतो आराम

संघातील काही वरिष्ठ खेळाडू जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांना टी-२० मालिकेसाठी आराम दिला जाण्याची शक्यता आहे. वरूण चक्रवर्तीच्या जागी हर्षल पटेलला संधी मिळू शकते. पटेलने गेल्या दोन हंगामात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे मात्र त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी संघात घेतले नव्हते. 

या खेळाडूंचे होऊ शकते पुनरागमन

श्रेयस अय्यर जो आधी टी-२०संघाचा भाग नव्हता त्याचे पुनरागमन होऊ शकते. दीपक आणि राहुल चाहरही संघात सामील होऊ शकतात. बाकी संघ आपल्या जागी कायम असू शकतो. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी२० सामने

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी सामन्यांची मालिका, ३ वनडे आणि ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरूवात डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी