India vs West Indies: चौथ्या टी-२० सामन्यात रोहित करणार हा मोठा बदल, घ्या जाणून

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 04, 2022 | 17:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ind vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या टी-२० सामना ६ ऑगस्टला खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग ११मध्ये मोठे बदल करू शकतो. 

rohit sharma
चौथ्या टी-२० सामन्यात रोहित करणार हा मोठा बदल, घ्या जाणून 
थोडं पण कामाचं
  • वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत श्रेयस अय्यर पूर्णपणे फ्लॉप ठरला.
  • त्याच्या बॅटमधून अजिबात धावा निघत होत्या. तो धावा काढण्यासाठी झुंजतोय.
  • आवेश खान कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडच्या भरोश्यावर अजिबात खरा उतरला नाही

मुंबई: भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध(india vs west indies) पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. अशातच चौथा सामना जिंकत रोहित शर्मा(rohit sharna) या मालिकेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करेल. यासाठी तो कोणतीही कमी सोडणार नाही. कर्णधार रोहित शर्मा फॉर्मशी झुंजत असलेल्या दोन प्लेयर्सना बाहेरचा रस्ता दाखवू शकतात. हे खेळाडू टीम इंडियावर(team india) ओझे बनले आहेत. rohit sharma will make a change in fourth t20 against west indies

अधिक वाचा - अमिताभ बच्चन, विराट कोहली 'हर घर तिरंगा' videoमध्ये

हे स्टार फलंदाज होऊ शकतात बाहेर

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत श्रेयस अय्यर पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याच्या बॅटमधून अजिबात धावा निघत होत्या. तो धावा काढण्यासाठी झुंजतोय. श्रेयस अय्यर पहिल्या टी-२० सामन्यात आपले खातेही खोलू शकला नाही. दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने १० धावा केल्या. तर तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने २४ धावा केल्या. अशातच टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. 

महागडा ठरला हा गोलंदाज

आवेश खान कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडच्या भरोश्यावर अजिबात खरा उतरला नाही. त्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना भरपूर धावा दिल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात आवेश खानने ३२ धावा देत केवळ एक विकेट मिळवली. तर तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ३ ओव्हरमध्ये ४७ धावा दिल्या. तर एकही विकेट मिळवला नाही. अशातच तो टीम इंडियासाठी डोकेदुखी बनला आहे. अशातच कर्णधार रोहित शर्मा त्याला प्लेईंग ११मधून बाहेर काढू शकतो. 

अधिक वाचा - संसद परिसरात राहुल गांधींचे रौद्र रूप तर पहा

हार्दिक पांड्याने रचला इतिहास

हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ ओव्हर गोलंदाजी करत त्याने ४.७५च्या इकॉनॉमीने केवळ १९ धावा खर्च केल्या आणि १ विकेट मिळवला. ही विकेट मिळवाना हार्दिक पांड्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ५० विकेट पूर्ण केल्या. तसेच जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केला. हार्दिक पांड्या भारताचा असा पहिला खेलाडू बनला आहे ज्याच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ५००पेक्षा जास्त धावा आहेत आणि ५० विकेट आहेत. हार्दिक ही कामगिरी करणारा जगातील ९वा खेळाडू ठरला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी