रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही?, गोंधळ कायम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 09, 2020 | 16:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rohit Sharma: रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत अद्याप संभ्रमाची परिस्थिती आहे. रोहित शर्मा जखमी असल्याने त्याला भारतीय संघात घेतलेले नाही, पण तो फिट होऊन आयपीएलचे सामने खेळत आहे.

Rohit Sharma
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला जाणार नाही, आता एकाच अटीवर मिळणार भारतीय संघात प्रवेश 

थोडं पण कामाचं

  • रोहित शर्मा जखमी असल्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या बाहेर
  • रोहित शर्मा फिट होऊन मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे आयपीएल
  • रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबतचा घोळ अद्याप चालूच

नवी दिल्ली: भारताचा (India) अनुभवी सलामीवीर (experienced opener) रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघासोबत (Indian cricket team) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia tour) न जाण्याची शक्यता आहे. त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबतचा गोंधळ अद्याप चालूच (confusion about Australia tour) आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने (BCCI source) सांगितले, ‘रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला जाणार (Sharma won’t go) नाही. त्याला भारतीय संघाचे फिजिओ (Indian team physiotherapist) नितिन पटेल (Nitin Patel) यांची फिटनेस चाचणी पार करावी (clear fitness test) लागेल. जर पटेल आणि राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीने (एनसीए) (National Cricket Academy) रोहित शर्माला फिट घोषित केले नाही तर तो ऑस्ट्रेलियाला जाणार नाही.’

२७ नोव्हेंबरपासून भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर

या सूत्राने पुढे सांगितले, ‘पण आम्हाला हेदेखिल पाहायचे आहे की कसोटी मालिकेपर्यंत रोहित शर्मा तंदुरुस्त होईल. विराट कोहलीने बोर्डाला लिहिले आहे की तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असणार नाही, कारण तो पिता होणार आहे. तेव्हापर्यंत रोहित शर्मा तंदुरुस्त झाल्यास तो शुभसंकेत असेल.’ भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून चालू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पूर्ण द्विपक्षीय मालिका खेळणार आहे ज्याची सुरुवात एकदिवसीय सामन्यांनी होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

आयपीएलमध्ये खेळत आहे रोहित शर्मा

२६ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या जंबो स्क्वाडची घोषणा झाली होती आणि रोहित शर्माची कोणत्याही स्वरूपाच्या सामन्यांसाठी दौऱ्यात निवड करण्यात आली नव्हती. तेव्हापासून रोहित शर्माच्या तंदुरुस्तीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र रोहित शर्माने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे आणि यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाकडून तो आयपीएल २०२०मध्ये खेळत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२०च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे जिथे त्यांचा सामना पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाशी होणार आहे.

सौरव गांगुलीने रोहित शर्माबद्दल केले होते हे विधान

रोहित शर्माबद्दल बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले होते की जर रोहित शर्माने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली तर त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवले जाईल. गांगुलीने आशा व्यक्त केली होती की रोहित शर्मा आणि इशांत शर्मा कसोटी मालिकेच्या आधी पूर्ण तंदुरुस्त होऊन आपल्या संघासह खेळण्यासाठी उभे राहतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी