Rohit Sharma IPL 2022 : रोहित शर्माचा षटकार...टाटांची दिलदारी...आसामच्या गेंड्यांना भेट मिळाले 5 लाख

Rohit Sharma Six : क्रिकेटचे (Cricket) मैदान हे नाट्यमय घटनांनी भरलेले असते. त्यातच जर आयपीएलचा (IPL 2022) सीझन असेल तर विचारूच नका. मैदान आणि त्यामुळे मैदानाबाहेर घडणाऱ्या घटना नेहमीच चर्चेत असतात. मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार रोहित शर्मा याला प्राण्यांविषयी खूप प्रेम आहे. प्राण्यांचा बचाव आणि त्यांचे संरक्षणाच्या मोहिमेत रोहित (Rohit Sharma)नेहमीच सहभागी असतो. गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध खेळताना रोहितने आपल्या एका शॉटने आसाममध्ये आढळणाऱ्या एक शिंगी गेंड्याला 5 लाख रुपये भेट मिळवून दिले.

Animal Lover Rohit Sharma
रोहित शर्माचे प्राण्यांवरील प्रेम 
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्माचे प्राण्यांबद्दल प्रेम सर्वांनाच माहित आहे
  • गुजरात टायटनविरुद्धच्या सामन्यात रोहितचा षटकार टाटा पंचवर आदळला
  • रोहितच्या षटकाराने काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला मिळवून दिली 5 लाखांची भेट

Rohit Sharma's gift to Rhinos : मुंबई : क्रिक्रेटचे (Cricket)मैदान हे नाट्यमय घटनांनी भरलेले असते. त्यातच जर आयपीएलचा (IPL 2022) सीझन असेल तर विचारूच नका. मैदान आणि त्यामुळे मैदानाबाहेर घडणाऱ्या घटना नेहमीच चर्चेत असतात. मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार रोहित शर्मा याला  प्राण्यांविषयी खूप प्रेम आहे. प्राण्यांचा बचाव आणि त्यांचे संरक्षणाच्या मोहिमेत रोहित शर्मा (Rohit Sharma)नेहमीच सहभागी असतो.  गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध खेळताना रोहितने आपल्या एका शॉटने आसाममध्ये आढळणाऱ्या एक शिंगी गेंड्याला 5 लाख रुपये भेट म्हणून मिळवून दिले. आसाममधील काझीरंगा (Kaziranga National Park) येथे हे एक शिंगी गेंडे (Rhinos)आढळतात आणि ते जगभर प्रसिद्ध आहेत. काझीरंगाच्या गेंड्यांना एकप्रकारे रोहित शर्माने भेटच दिली आहे. गुजरातविरुद्धच्या डावातील दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या चौकारावर त्याने षटकार ठोकला. टाटा समूह (Tata Group) आपल्या समाजसेवी कामांसाठी जगप्रसिद्ध आहे. क्रिक्रेटच्या खेळातून अशी जबरदस्त युक्ती लढवत टाटांनी काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला 5 लाख रुपयांची भेट दिली आहे. (Rohit Sharma's six scratches Tata Punch in IPL, gets Rs 5 lakhs gift to Rhinos in Kaziranga)

अधिक वाचा : Indian Team: भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी हे खेळाडू प्रमुख दावेदार; मिडिल ऑर्डरची सांभाळणार धुरा 

रोहितचा डीप मिडविकेटवर षटकार

गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या सामन्यात कॅरेबियन गोलंदाज अल्झारी जोसेफच्या लेन्थ बॉलवर रोहित शर्मा दणदणीत शॉट खेळला. चेंडू बुलेटच्या वेगाने डीप मिडविकेटच्या सीमारेषेबाहेर गेला. चेंडू इथे उभ्या असलेल्या Tata Punch या कारवर आदळला. रोहित शर्माच्या या षटकारातून आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला (Kaziranga National Park)पाच लाख रुपये मिळतील. अशाप्रकारे रोहितने फटकेबाजीने मुंबईसाठी केवळ धावा केल्या नाहीत तर एक उदात्त कामगिरीही केली.

अधिक वाचा : IPL 2022 : मुंबईचा थरारक विजय, गुजरातचा सलग दुसरा पराभव

टाटांची ही आहे अट 

यात महत्त्वाची बाब अशी की टाटा मोटर्स (Tata Motors) ही आयपीएलची अधिकृत प्रायोजक आहे. बॅट्समनचा शॉट टाटा पंच बोर्ड किंवा सीमेबाहेर उभ्या असलेल्या 'पंच कार'वर आदळल्यास काझीरंगा नॅशनल पार्कला 5 लाख रुपये देण्‍याची घोषणा या गटाने केली होती. हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्यांचे घर म्हणून ओळखले जाते.

तत्पूर्वी, ब्रेबॉर्न स्टेडियमवर IPL 2022 च्या 51 व्या सामन्यात, गुजरात टायटन्स (GT) ने मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने आत्तापर्यंत 10 सामने खेळले असून त्यात आठ जिंकले आहेत आणि दोन सामन्यात ते पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर मुंबईला एकूण नऊ सामन्यांत आठ पराभव आणि एकाच सामन्यात यश मिळाले आहे.

अधिक वाचा : रात्री कारखान्यात मजुरी, दिवसा क्रिकेट... असं करुन कार्तिकेयचे स्वप्न झाले साकार

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-

गुजरात टायटन्स संघ: रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, प्रदीप संगवान, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ आणि मोहम्मद शमी.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी