T20 World Cup : टी-२० विश्वचषकासाठी रोहित शर्माची रणनीती तयार, पंतला डच्चू मिळण्याची शक्यता

T20 World Cup Plan : कर्णधार रोहित शर्माला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी अधिक वेळ द्यायचा आहे. भारताच्या अंतिम अकराच्या संघामध्ये कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी एकाची निवड करत आहे. आशिया कपमध्ये पंतची निवड झाली होती, तर कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली आणि कार्तिकने या संधीचा फायदा  करून घेतला आहे.

Chances of Pant getting Dutch in T20 World Cup
टी-२० विश्वचषकात पंतला डच्चू मिळण्याची शक्यता   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आशिया कपमध्ये पंतची निवड झाली होती.
  • कर्णधार रोहित शर्माला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी अधिक वेळ द्यायचा आहे.

हैदराबाद : टीम इंडियाने (Team India) घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचा (Australia) २-१ असा पराभव केला. आता दक्षिण आफ्रिकेच्या संघसोबत भारत टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.  टीम इंडियाने टी-२० विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) संघसंबंधित आपले जवळपास सर्व प्रयोग केले. कर्णधार (Captain) रोहित शर्माने (Rohit Sharma)पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी आपली रणनीती काटेकोरपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. या प्लाननुसार, ऋषभ पंतला  टी20  विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे.  (Rohit Sharma's strategy ready for T20 World Cup, possibility to give dutch to Pant)

अधिक वाचा :बारामतीतील भरकार्यक्रमात गोंधळ, ताईच्याच समोर भिडले दोन गट

कर्णधार रोहित शर्माला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी अधिक वेळ द्यायचा आहे. भारताच्या अंतिम अकराच्या संघामध्ये कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी एकाची निवड करत आहे. आशिया कपमध्ये पंतची निवड झाली होती, तर कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली आणि कार्तिकने या संधीचा फायदा  करून घेतला आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला, 'मला विश्वचषकापूर्वी या दोन खेळाडूंना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे.

अधिक वाचा : मधुमेहींनी नवरात्रीत उपवास ठेवताना लक्षात ठेवा या गोष्टी

आशिया चषकात हे दोघेही सर्व सामने खेळण्याची शक्यता होती.' तो म्हणाला, "पण मला वाटते, दिनेशला आणखी वेळ देण्याची गरज आहे.  या मालिकेत त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही."कार्तिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ८ चेंडू खेळले, तर पंतने एक सामना खेळला, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.रोहित म्हणाला, 'पंतलाही वेळ हवा आहे, पण या मालिकेत फलंदाजीत सातत्य राखणे महत्त्वाचे होते.'  रोहितच्या या विधानामुळे पंतच्या निवडीसमोर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. कारण पुढील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये या दोन्ही खेळाडूंच्या निवडीवर रोहित म्हणाला की,  परिस्थीतीवर या दोघांची निवड अवलंबून असेल. 
 


 'दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय होईल हे मला माहीत नाही. त्यांची गोलंदाजी पाहावी लागेल. आम्हाला फलंदाजीत लवचिकता हवी आहे. परिस्थितीनुसार डावखुर्‍या फलंदाजाला मैदानात उतरवायचे असेल तर आम्ही ते करू आणि उजव्या हाताच्या फलंदाजाची गरज भासल्यास त्याला मैदानात उतरवले जाईल. या सर्वांच्या व्यवस्थापनाबाबत अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल, असं रोहितने आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी