Rohit sharma: 'अरे फोटो तो ले लो यार' रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 18, 2022 | 17:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

India cricket team celebration:भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिका ट्रॉफी जिकल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह सेलिब्रेशन केले. शिखर धवन आणि ऋषभ पंतने सुरूवातीला शँपेन उडवत जल्लोष केला. नंतर विराट कोहलीनेही शँपेन उघडली.

team india winner
'अरे फोटो तो ले लो यार' रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्माने ट्रॉफी मिळवल्यानंतर धवन आणि पंतने शँपेन उडवली.
  • रोहितने सर्वांना फोटो काढण्यास सांगितले
  • भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. 

मँचेस्टर: टीम इंडियाने(team india) टी-२० आणि वनडे मालिकेत इंग्लंडला त्यांच्यात जमिनीवर मात दिली. भारतीय संघाने(indian team) रविवारी तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत इंग्लंडला ४७ चेंडू राखत पाच विकेटनी मात दिली. २६० धावांचा पाठलाग करताना भारताने सुरूवातीला ७२ धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ऋषभ पंत(rishabh pant) आणि हार्दिक पांड्याने(hardik pandya) पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची शतकी भागीदारी करत टीम इंडियाला केवळ विजयच मिळवून दिला नाही तर मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली. Rohit sharna video viral during team india celebation

अधिक वाचा - विठ्ठलाच्या चरणावर तब्बल 'एवढ्या' कोटीची देणगी

ऋषभ पंतने आपल्या वनडे करिअरमधील पहिले शतक ठोकले. तर हार्दिक पांड्याने बॉल आणि बॅटने धमाल केली. पांड्याने  आधी चार विकेट घेतल्या आणि त्यानंतर ७१ धावांची खेळी केली. भारताने या पद्धतीने वनडे मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. भारतीय खेळाडू जेव्हा ट्रॉफी मिळवण्याचा जल्लोष करत होते तेव्हा मजेदार दृश्य पाहायला मिळाले. 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने जशी हातात ट्रॉफी घेतली तसेच त्याचा सहकारी शिखर धवनने शँपेन उडवण्यास सुरूवात केली. ऋषभ पंतने उजव्या बाजूने आणखी एक शँपेन उघडली आणि उडवण्यास सुरूवात केली. रोहित शर्माने सर्वांना एकत्रित येत फोटो घेण्याचा आग्रह केला मात्र जल्लोष सुरूच होता. रोहित शर्मा थोडासा चिडला आणि त्याने हलक्या रागात म्हटले की 'अरे फोटो तो ले लो यार'. हा जल्लोष तरीही थांबला नव्हता आणि रोहित शर्माला पुन्हा फोटो काढण्यासाठी बोलवावे लागले. 

रोहित शर्माने अर्शदीप सिंहच्या हातात ट्रॉफी दिली. टीमने एकत्रित येत फोटो घेतला आणि तेव्हाच विराट कोहलीने पाठीमागून शँपेनची बॉटल खोलत उडवणे सुरू केले. कोहलीने शिखर धवनला शँपेनने भिजवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खेळाडूंनी यावेळेस चांगलेच सेलिब्रेशन केले. कारण इंग्लंडमध्ये भारताचा हा तिसरा वनडे मालिका विजय होता. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. 

अधिक वाचा - खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण, एका झटक्यात कमी झाले 30 रु

ऋषभ पंतला तिसऱ्या वनडेसाठी प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले. तर हार्दिंक पांड्याला तीन सामन्यांत १०० धावा आणि ६ विकेट मिळवण्यासाी प्लेयर ऑफ दी सीरीज निवडण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी